शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

वीज नाही तर पाणीही नाही

By admin | Updated: June 19, 2017 02:13 IST

नवेगाव- खैरी, कन्हान व जुना गोरेवाडा यासह पाच जलशुद्धीकरण केंद्रांचा वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने

नागरिक त्रस्त : ४५ दिवसात १६ वेळा वीज पुरवठा खंडित लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नवेगाव- खैरी, कन्हान व जुना गोरेवाडा यासह पाच जलशुद्धीकरण केंद्रांचा वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागपूर शहरातील काही भागातील नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. तसेच काही भागात अपुरा पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांना पाणी टंचाईच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.गेल्या ४५ दिवसात जलशुद्धीकरण केंद्रांचा १६ वेळा वीज पुरवठा खंडित झाला. यामुळे ४१.२५ तास पंपिंग बंग राहिले. वीज पुरवठा खंडित झाल्याने विस्कळीत झालेला पाणीपुरवठा वीज पूर्ववत आल्यानंतरही सुरळीत होण्यासाठी बराच वेळ लागतो. तसेच यामुळे पंपिंगचे नुकसान होते. २४० एमएलडी क्षमतेच्या कन्हान जलशुद्धीकरण केंद्राचा ४९ वेळा वीज पुरवठा खंडित झाला. यामुळे १८.१५ तास पंपिंग बाधित होते. १३६ एमएलडी क्षमतेच्या पेंच-१ जलशुद्धीकरण केंद्राचा ११ वेळा , १४५ एमएलडी क्षमतेच्या पेंच-२ केंद्रात ५ वेळा, १२० एमएलडी क्षमतेच्या पेंच-३ केंद्रात ८ वेळा तर १६ एमएलडी क्षमतेच्या गोरेवाडा केंद्रात १४ वेळा वीज पुरवठा बांधित झाला. नवेगाव- खैरी पंपिंग स्टेशन आणि गोरेवाडा केंद्राचा वीज पुरवठा खंडित झाल्याने शहराच्या पश्चिम, मध्य, दक्षिण-पश्चिम आणि दक्षिण नागपूरच्या काही भागाचा पाणी पुरवठा बाधित झाला होता. कन्हान केंद्रात वीज पुरवठा बाधित झाल्यास पूर्ण,उत्तर आणि दक्षिणच्या काही भागाचा पाणीपुरवठा बाधित राहिला. वारंवार वीज पुरवठा खंडित झाल्याने जलवाहिनीत हवा शिरते. ती बाहेर काढण्यासाठी बराच कालावधी लागतो. तसेच जलवाहिनीत दूषित पाणी शिरण्याचा धोका निर्माण होतो. जलशुद्धीकरण केंद्रांचा थोडावेळ वीज पुरवठा खंडित झाला तरी यामुळे जलकुंभांची पाण्याची पातळी कमी होते. याचा शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो. पाच मिनिटे वीज पुरवठा खंडित झाला तरी पंपिंग सुरू होऊ न जलवाहिनीत अपेक्षित जलप्रवाह येण्यासाठी अडीच तासाचा कालावधी लागतो. दुसरीकडे वारंवार वीज पुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्याने टँकरची मागणी वाढते. नागरिकांनी अशा प्रसंगी सहकार्य करावे, असे आवाहन आॅरेज सिटी वॉटर यांनी केले आहे.