शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

नाग नदीमध्ये पाणी नाहीच, घाण वाहते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:08 IST

निशांत वानखेडे नागपूर : शहरातून वाहणाऱ्या नाग नदी, पिवळी नदी व पोहरा नदीमधून पाणी नाही तर निव्वळ घरातून निघणारे ...

निशांत वानखेडे

नागपूर : शहरातून वाहणाऱ्या नाग नदी, पिवळी नदी व पोहरा नदीमधून पाणी नाही तर निव्वळ घरातून निघणारे सांडपाणी व घाण वाहते. पावसाळ्यात काय ते शुद्ध पाणी जात असेल तेवढेच. या नद्या इतक्या प्रदूषित झाल्या आहेत की या पाण्याने वापर तर शक्य नाहीच पण सिंचन व मासेमारीसाठीही या पाण्याचा वापर अशक्य आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळा(सीपीसीबी)च्या निरीक्षणानुसार या नद्यांचे पाणी उपयाेगी पाण्याच्या ‘अ’ पासून ‘ड’ पर्यंत कोणत्याच मानकात बसत नाही.

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था(नीरी)ने सादर केलेल्या शहराच्या पर्यावरण स्थिती अहवालातून तिन्ही नद्यांच्या जैविक व रासायनिक प्रदूषणाची स्थिती स्पष्ट केली आहे. प्रदूषणाच्या प्रत्येक घटक या नद्यांमध्ये समाविष्ट आहे. सांडपाण्यासह घरगुती कचरा, औद्योगिक कचरा, कृषिकचरा, घनकचरा, रुग्णालयांचा कचरा, कत्तलखान्याची घाण व अशुद्ध सिवेज असे सारेकाही या नद्यांमध्ये दररोज मिसळले जाते. ते पाणी मानवच नाही तर प्राण्यांच्या व पिकांच्याही उपयोगाचे नाही. दुसरीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा(एमपीसीबी)च्या अहवालानुसार या पाण्यामुळे कन्हान व पुढे गोसीखुर्द डॅमजवळ वैनगंगा नदीचा प्रवाहसुद्धा प्रदूषित होत आहे.

रासायनिक प्रदूषणाची स्थिती

प्रदूषके टीएसएस सीओडी बीओडी आम्लपणा फाॅस्फेट काेलिफाॅर्म

नाग नदी २०-६०० २०-२८० ६२-१८८० ३२० २.५- ११.३ ४२-४२४

पिवळी नदी ४-११६० २०-२८० ३-११८ ८८०-६००० १.६- ८.२ २६-५२

पाेहरा नदी ३७-२१५५ ७६-९०० १७-२५५ ५४० ६.४ २१-१४१

(सर्व प्रमाण मिलिग्रॅम/लिटरमध्ये)

- काेलिफाॅर्मचे अस्तित्व म्हणजे अत्याधिक सिवेज नद्यांमध्ये जात आहे.

- सीओडी व बीओडीचे अधिक प्रमाण म्हणजे ऑक्सिजन निर्मितीची क्षमता प्रमाणापेक्षा कमी झाली आहे.

- फाॅस्फेटसारखे पाेषण घटक वाढल्याने वनस्पतींच्या अस्तित्वावर धाेका. प्राण्यांसाठीही वापरणे शक्य नाही.

नद्यांच्या सद्यस्थितीचा आराखडा

- नाग नदी लाव्हा येथून उगम पावते व कन्हान नदीला मिळते. एकूण विस्तार १७ किमी.

- पिवळी नदी गाेरेवाडा तलावातून उगम पावत पावनगावमध्ये नाग नदीत मिळते. १८ किमीचे पात्र.

- नागपूरचे ६५० एमएलडीपैकी जवळपास ४३० एमएलडी सिवेज थेट नद्यांमध्ये जाते.

- पावसाळ्यात फ्रेश पाणी, इतर वेळी केवळ सिवेज.

- भांडेवाडीत ३३० एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करून हाेऊन काेराडी थर्मल प्लॅन्टला दिले जाते.

भूजल सुरक्षित पण...

नागपूर परिसरात दरवर्षी २५ दशलक्ष घनमीटर भूजल उपलब्ध आहे. शहराच्या मध्यभागी ते १.६५ ते २ मीटरवर मिळते व सभाेवताल ४ ते १६ मीटरपर्यंत खाली आहे. तपासलेल्या सर्व १९ नमुन्यावरून पीएचस्तर, डिसाॅल्व्ह साॅलिड, हार्डनेस, धातूच्या अस्तित्वाचा अभ्यास केला असता शहरातील भूजल पिणे व वापरण्यासाठी पूर्ण सुरक्षित आहे. मात्र नायट्रेटचे प्रमाण ३० ते ५०० मिग्रॅ/लि. आढळून आले असून, ते मर्यादेपेक्षा अधिक आहे. यापेक्षा गंभीर म्हणजे बहुतेक नमुन्यांमध्ये काेलिफाॅर्मचे प्रमाण आढळल्याने सिवेजचा निचरा भूजलात हाेत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.