शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या गीताचे रोपटे बहरेल अशी जमीनच नाही

By admin | Updated: July 8, 2017 02:28 IST

आज ३६ वर्षे झालीत मी चित्रपटांसाठी गाणी लिहितोय. ‘नजर के सामने जिगर के पास...’ ते ‘मुश्कील बडी है रस्म- ए- मोहब्बत...’ या माझ्याच रचना आहेत.

गीतकार समीर : ‘चार बोटल वोडका’ ऐकून मन व्यथित होत असल्याची खंत लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आज ३६ वर्षे झालीत मी चित्रपटांसाठी गाणी लिहितोय. ‘नजर के सामने जिगर के पास...’ ते ‘मुश्कील बडी है रस्म- ए- मोहब्बत...’ या माझ्याच रचना आहेत. परंतु काळ बदलला तसे पोटासाठी मलाही बदलावे लागले. आता जेव्हा मी ‘सरकाय लेव खटिया’सारखी गाणी लिहितो तेव्हा श्रोत्यांना हा बदल पचवणे अवघड जाते. परंतु माझ्या गीताचे रोपटे बहरेल अशी जमीनच आज उपलब्ध नाही त्याला मी तरी काय करणार, अशी खंत प्रसिद्ध गीतकार समीर अर्थात समीर अंजान पाण्डेय यांनी व्यक्त केली. एका चॅरिटेबल शोसाठी नागपुरात आले असता शुक्रवारी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी भारतीय संगीताच्या इतिहासापासून तर वर्तमान राजकीय स्थितीपर्यंत त्यांनी अतिशय मोकळेपणाने आपल्या भावना व्यक्त केल्या. समीर पुढे म्हणाले, चित्रपटामध्ये व्यक्तिरेखा, कलाकार यांना डोळ्यासमोर ठेवून प्रसंगानुरूप व दिग्दर्शकाची मागणी डोळ्यासमोर ठेवून गीतलेखन करणे ही एक प्रकारची कसरत असते. मी ती अभ्यासपूर्वक जमविली. यात मला आनंद-मिलिंद, नदीम-श्रवण, अन्नू मलिक यांची मोलाची साथ लाभली. परंतु आता चित्रपटांचा तो सुवर्णकाळ ओसरतोय. चित्रपटांची संख्या वाढल्याने व सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे प्रेक्षकांचे आकर्षण कमी होत आहे. शिवाय जे थोडे फार प्रेक्षक आहेत त्यांचाही पसंतीक्रम बदलला आहे. त्यामुळेच हनीसिंगसारखे गायक ‘चार बोटल वोडका, काम मेरा रोजका’ ही आपली दिनचर्या गाण्यात मांडतात आणि लोक त्याला डोक्यावर घेतात. अशा या स्थितीत ‘चिठ्ठी आई हैं...’ सारखे गाणे कुणी ऐकणार तरी कसे, असा सवाल करीत त्यांनी आपल्याला आवडतील असे गाणे लिहून ते स्वत:च्या यु-ट्यूब चॅनलवर रिलीज करणार असल्याचे सांगितले. गरीब विद्यार्थ्यांच्या शोसाठी मानधन नाकारले शनिवारी माझा नागपुरात जो शो होतोय त्याचे आयोजक असलेल्या मैत्री परिवाराचे पदाधिकारी माझ्याकडे आले व गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी निधी उभारण्याकरिता हा शो करीत असून आपल्याला अपेक्षित रक्कम देऊ शकणार नाही, असे त्यांनी सांगितले. ते माझ्या अंत:करणाला भिडले व मी या शोसाठी मानधन न घेण्याचा निर्णय घेतला, अशी माहितीही समीर यांनी दिली.