शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशनात प्रश्नोत्तरे नाही अन् विभागही नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 00:28 IST

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनात यंदा हटके राहणार आहे. पूर्ण अधिवेशनात विधानसभा व विधान परिषदेत प्रश्नोत्तराचा तास राहणार नाही. म्हणून यावेळी विधिमंडळातील प्रश्नोत्तरे सांभाळणारा विभागच (कक्ष) दिसणार नाही.

ठळक मुद्देप्रश्नोत्तर विभागच दिसणार नाही : कर्मचारी पोहोचले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनात यंदा हटके राहणार आहे. पूर्ण अधिवेशनात विधानसभा व विधान परिषदेत प्रश्नोत्तराचा तास राहणार नाही. म्हणून यावेळी विधिमंडळातील प्रश्नोत्तरे सांभाळणारा विभागच (कक्ष) दिसणार नाही. त्यामुळे विभागात कार्यरत कर्मचारी सुद्धा नागपुरात पोहोचलेले नाहीत.हिवाळी अधिवेशनासाठी केवळ सहा दिवसाचे कामकाज निश्चित करण्यात आले आहे. १९ डिसेंबर रोजी कामकाज सल्लागार समितीची बैठक होईल. या बैठकीत कामकाज वाढवायचे की नाही, यावर निर्णय घेतला जाईल. सध्या सरकारशी संबंधित सूत्रांनी मात्र अधिवेशनाचा कालावधी वाढेल, याची शक्यता नाकारली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, सरकार स्थापन होण्यास एक महिन्यापेक्षा अधिक वेळ लागला. ३० नोव्हेंबर रोजी आमदारांनी शपथ घेतली. अशावेळी त्यांना अधिवेशनाच्या तयारीसाठी वेळच मिळाला नाही. आमदारांकडून आॅनलाईन प्रश्नही पुरेशा प्रमाणावर मिळाले नाहीत. सरकारच्या अजेंड्यात जितके कामकाज आहे, ते सहा दिवसात पूर्ण होईल. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनीसुद्धा विधिमंडळाचे कामकाज हे त्यांच्या अध्यक्ष बनण्यापूर्वीच निश्चित झाल्याचे सांगत याचे संकेत दिले होते. सोबतच त्यांनी पुढचे अधिवेशन हे नागपूर कराराप्रमाणे व्हावे, याची काळजी घेण्याचा प्रयत्न करू, असेही सांगितले होते.सरकारशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की, कामकाज कमी आहे आणि प्रश्नही कमी आले आहेत. त्यामुळे प्रश्नोत्तराचा तास ठेवण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे दोन्ही सभागृहाचे कामकाज हे एका तासाच्या प्रश्नोत्तरानेच सुरु होत असते. आमदारांचे प्रश्न व मंत्र्यांची लिखित उत्तरे याच्या पुस्तिकेचे वितरण केले जाते. आमदारांकडून ऑनलाईनसुद्धा प्रश्न घेतले जातात. या कार्यासाठी विधानसभा व विधान परिषदेसाठी वेगवेगळे काऊंटरसुद्धा असतात. परंतु यंदा हे काऊंटर राहणार नाही. यामुळे प्रश्नोत्तरे विभागच यंदा राहणार नाही. या विभागातील कर्मचाऱ्यांना नागपुरात न येण्याबाबत सांगण्यात आले आहे. दुसरीकडे विधिमंडळ सूत्राचे म्हणणे आहे की, प्रश्नोत्तराचा तास नसला तरी आमदारांना त्यांच्या मतदार क्षेत्रातील प्रश्न उपस्थित करण्यासाठी इतरही पर्याय उपलब्ध आहेत. त्यांना वेगवेगळ्या संसदीय आयुधांचा वापर करता येऊ शकतो.आमदारांच्या अधिकारांचे हननप्रश्नोत्तरे नसल्यामुळे विरोधी पक्षातील आमदारांमध्ये प्रचंड रोष आहे. भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी म्हटले आहे की, हे आमदारांच्या अधिकारांचे हनन आहे. आमदार दोन दिवसापूर्वीसुद्धा प्रश्न देऊ शकतात. प्रश्नोत्तरे न ठेवून सरकार प्रश्नांपासून दूर पळण्याचा प्रयत्न करीत आहे. ते केवळ पिकनिकसाठी नागपुरात येत आहेत.कर्मचाऱ्यांची संख्याही झाली कमीविधिमंडळ अधिवेशन केवळ सहा दिवसांचे असल्याने यंदा मुंबई विधिमंडळातील सर्वच कर्मचारी नागपुरात पोहोचलेले नाहीत. प्रश्नोत्तरे विभागातील तर एकही कर्मचारी आलेला नाही. सूत्रानुसार अधिवेशनासाठी मुंबई विधिमंडळातील जवळपास ५०० कर्मचारी येतात. परंतु यंदा ३५० कर्मचारीच आतापर्यंत नागपुरात पोहोचले आहेत.

 

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनnagpurनागपूर