शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग वर्गीकृत करण्यासाठी मनपाकडून प्रस्ताव नाही

By admin | Updated: April 13, 2017 03:10 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महामार्गांजवळ असलेल्या राज्यभरातील १५ हजारांहून अधिक दारू दुकानांना फटका बसला आहे.

राज्यातील १५ हजारांहून अधिक दारूदुकाने बंद : प्रस्ताव आल्यास शासन विचार करणार नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महामार्गांजवळ असलेल्या राज्यभरातील १५ हजारांहून अधिक दारू दुकानांना फटका बसला आहे. राष्ट्रीय व राज्य महामार्ग स्थानिक स्वराज्य संस्थांकडे वर्गीकृत करण्यासंदर्भात लोकप्रतिनिधींकडून देखील शासनदरबारी मागणी होत आहे. मात्र प्रत्यक्षात नागपूर मनपाकडून याबाबत कुठलाही प्रस्ताव शासनाला गेलेला नाही. खुद्द उत्पादनशुल्क मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीच ही माहिती दिली आहे. महामार्गापासून ५०० मीटर अंतरावरील सर्व दारू दुकाने बंद करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. याचा फटका राज्यातील एकूण १५६९९ दुकानांना बसला. नागपूर जिल्ह्यात ८७१ दुकाने बंद झाली. राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग नागपूर मनपाकडे वर्गीकृत करण्यात यावे, अशी मागणी दारू दुकान मालक तसेच लोकप्रतिनिधींकडूनदेखील होत आहे. अनेक शहरांत ‘बायपास’ मार्ग झाले आहेत. त्यामुळे शहरातून जाणाऱ्या महामार्गांवर जड वाहने येणे कमी झाले आहे. देशातील बऱ्याच शहरात असे मार्ग स्थानिक स्वराज्य संस्थांकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात २००१ च्या शासननिर्देशांनुसार यासंबंधी तरतूद आहे. जी दुकाने बंद झाली आहेत, तेथे अवैधरीत्या दारूविक्री होत नसेल याची काहीच शाश्वती नाही. त्यामुळे महापालिकेचा किंवा नगर परिषदेचा प्रस्ताव आला तर शासननिर्देश असल्यामुळे महामार्ग हस्तांतरणाबाबत विचार करण्यात येईल. अद्यापपर्यंत असा प्रस्ताव आला नसल्याचेदेखील बावनकुळे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)