शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

हातात हात घालून लढण्याची गरज

By admin | Updated: February 12, 2017 02:24 IST

आज झेंडा कुणाच्या हाती आहे. कोण पुढे आहे, आणि कोण मागे. या सर्व गोष्टी विसरून प्रत्येकाने एकदुसऱ्याच्या हातात हात घालून एकजूट

भारतीय महिला फेडरेशनची सभा : स्मिता पानसरे यांचे प्रतिपादन नागपूर : आज झेंडा कुणाच्या हाती आहे. कोण पुढे आहे, आणि कोण मागे. या सर्व गोष्टी विसरून प्रत्येकाने एकदुसऱ्याच्या हातात हात घालून एकजूट होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भारतीय महिला फेडरेशनच्या राज्य अध्यक्षा स्मिता पानसरे यांनी केले. भारतीय महिला फेडरेशनच्यावतीने ‘आजच्या परिस्थितीमध्ये स्त्री शक्तीच्या आंदोलनाची दशा व दिशा’ या विषयावर शनिवारी एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. आमदार निवासाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भारतीय महिला फेडरेशनच्या राष्ट्रीय सचिव अ‍ॅनी राजा, राज्य सचिव लता भिसे, नूरजी व गार्गी चक्रवर्ती उपस्थित होत्या. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते भारतीय महिला फेडरेशन या संघटनेसाठी आयुष्यभर झटणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांचा सत्कार करण्यात आला. पानसरे पुढे म्हणाल्या, सध्या विरोधक उघडपणे वार करू लागले आहे. त्यामुळे आम्हाला सावध झाले पाहिजे. आम्हाला समाज परिवर्तन करायचे आहे. त्यासाठी लढाई सुरू आहे. मात्र सोबतच समाजाची वाटचाल कोणत्या दिशेने सुरू आहे, हेही ओळखण्याची गरज आहे. समाजात हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशातील इतिहास आणि अभ्यासक्रम बदलविला जात आहे. केंद्र सरकार एखाद्या गारुड्याप्रमाणे नवनवीन खेळ करीत आहे. अशा लोकांना पुरोगामी विचारांची भीती वाटत होती, म्हणून पुरोगामी विचारांच्या लोकांचे जाणीवपूर्वक खून केले असाही त्यांनी आरोप केला. संघटनेच्या राष्ट्रीय सचिव अ‍ॅनी राजा यांनी अशा कार्यक्रमातून भविष्यासाठी ऊर्जा मिळत असल्याचे सांगितले. तसेच गार्गी चक्रवर्ती यांनी मार्गदर्शन करताना आज आम्ही आमच्या संविधानाचे रक्षण करीत आहे, की नाही, अशी मनात भीती वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन उषा मिश्रा यांनी केले तर रंजना महाजन-काळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)