शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लग्नपत्रिका असूनही बँकेत पैसे मिळेना

By admin | Updated: February 2, 2017 02:12 IST

शासनाच्या नोटाबंदी निर्णयाचा फटका अद्यापही कायम आहे. दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटूनही आर्थिक घडी विस्कटली

नोटाबंदीचा फटका कायम : सांगा, लग्न उरकायचे कसे? देवलापार : शासनाच्या नोटाबंदी निर्णयाचा फटका अद्यापही कायम आहे. दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटूनही आर्थिक घडी विस्कटली असल्याने एका महिलेवर मुलीच्या लग्नाचे संकट ओढवले आहे. ‘आपलेच पैसे आणि आपणच चोर’ अशा बिकट स्थितीत केवळ २४ हजारांत लग्नसोहळा उरकायचा कसा असा प्रश्न त्या महिलेचा आहे. देवलापार येथील निवासी मालती सहादेव राठोड यांच्या मुलीचे लग्न ५ फेब्रुवारीला आहे. त्यांनी लग्नासाठी काही रक्कम स्टेट बँकेच्या रामटेक शाखेत जमा केली होती. तसेच भविष्य निर्वाह निधीतून १ लाख ९० हजार रुपयांची उचल केली. वन विभागात चतुर्थ श्रेणी कर्मचारी असलेल्या या महिलेच्या बँक खात्यात १ लाख ९० हजारांची रक्कम जमा झाली. परंतु बँकेतून पैसेच मिळत नसल्याने त्यांची मोठी परवड होत आहे. सदर महिला मंगळवारी रामटेकच्या स्टेट बँकेत पैसे काढण्यासाठी गेली असता, त्यांना केवळ २४ हजार रूपये देण्यात आले. त्यांनी मुलीच्या लग्नाची माहिती दिली. सोबत लग्नपत्रिकाही जोडली. परंतु बँक अधिकाऱ्यांनी त्यांचे काहीही ऐकून घेतले नाही. उलट डेकोरेशन व सर्वांना धनादेश द्या, असे बँकेकडून बजावून सांगण्यात आले. वारंवार विनवणी करून शाखा व्यवस्थापक काहीही ऐकण्यास तयार नसल्याने ती महिला हताश झाली आहे. लग्नसमारंभ असणाऱ्यांना अडीच लाखांपर्यंत रकमेची उचल करता येईल, असा नियम असताना ग्रामीण भागात चित्र वेगळेच आहे. नोटाबंदी निर्णयाच्या नियोजनशून्यतेचा फटका अद्यापही सहन करावा लागत असल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)