शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

अल्पवयीन मुलीला वासनेची शिकार करणाऱ्यास दया नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 11:05 IST

अल्पवयीन मुलीला वासनेची शिकार करणाऱ्या आरोपींना कमाल शिक्षा सुनावणे गरजेचे आहे असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी नुकताच एका प्रकरणात दिला.

ठळक मुद्देहायकोर्टाचा दणका कमाल शिक्षा सुनावणे गरजेचे

राकेश घानोडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अल्पवयीन मुलीला वासनेची शिकार करणाºया आरोपीवर दया दाखवली जाऊ शकत नाही. पोक्सो कायद्याचा उद्देश पूर्ण होण्यासाठी अशा आरोपींना कायद्यात सांगितल्यानुसार कमाल शिक्षा सुनावणे गरजेचे आहे असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी नुकताच एका प्रकरणात दिला.दया दाखवून कारावासाची शिक्षा कमी करावी अशी विनंती प्रकरणातील आरोपीने न्यायालयाला केली होती. न्यायालयाने प्रकरणातील तथ्ये व पुरावे लक्षात घेता आरोपीची विनंती फेटाळून लावली. अल्पवयीन बालकांचे लैंगिक अत्याचार व छळापासून संरक्षण करण्याचा उद्देश डोळ्यापुढे ठेवून संसदेने पोक्सो कायदा लागू केला. तसेच, बालकांवरील लैंगिक अत्याचाराची प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी विशेष न्यायालयांची स्थापना करण्यात आली. या कायद्यात सांगितलेल्या व्याख्येनुसार आरोपीने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे आरोपीवर दया दाखविली जाऊ शकत नाही. तसेच, बलात्काराचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर आरोपीला पोक्सो कायद्यात सांगितल्यानुसार कमाल शिक्षा सुनावणे आवश्यक आहे असे निरीक्षण न्यायालयाने या निर्णयात नोंदविले.३१ जानेवारी २०१८ रोजी विशेष सत्र न्यायालयाने आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची कमाल शिक्षा सुनावली. त्या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने वरील बाबी स्पष्ट करून सत्र न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला व आरोपीचे अपील फेटाळून लावले.

असे आहे प्रकरणही घटना जरीपटका पोलिसांच्या हद्दीत घडली होती. आकाश देवानंद टेम्पे (२८) असे आरोपीचे नाव असून तो कबीरनगर येथील रहिवासी आहे. १५ एप्रिल २०१६ रोजी पीडित मुलगी तिच्या आईसोबत एका लग्नात गेली होती. दरम्यान, आरोपीने मुलीला बळजबरीने एका पडक्या घरात नेले व तिच्यावर बलात्कार केला. नातेवाईकांनी मुलीचा शोध घेतल्यानंतर तिने घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर तत्काळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. घटनेच्या वेळी पीडित मुलगी १५ वर्षे वयाची होती. ती इयत्ता सातवीमध्ये शिकत होती. साक्षीदारांचे बयान, वैद्यकीय व रासायनिक अहवाल यावरून आरोपीने मुलीवर बलात्कार केल्याचे सिद्ध झाले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय