शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक बंदीमुळे उद्योजकांमध्ये नाराजी , अध्यादेशात स्पष्टता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 23:53 IST

केंद्र सरकारच्या अध्यादेशात एकल प्लास्टिकच्या उपयोगाच्या यादीत सुस्पष्टता नसल्यामुळे उद्योजक आणि विक्रेत्यांमध्ये संभ्रम पसरला आहे.

ठळक मुद्देविदर्भात एक हजार उद्योजकांवर संकट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पूर्वी राज्य शासनाने आणि आता केंद्र शासनाने एकल उपयोगाच्या प्लास्टिकवर बंदी टाकली आहे. राज्य शासनाने एकल उपयोगाच्या वस्तूंची यादी जाहीर केली होती. पण केंद्र सरकारच्या अध्यादेशात एकल प्लास्टिकच्या उपयोगाच्या यादीत सुस्पष्टता नसल्यामुळे उद्योजक आणि विक्रेत्यांमध्ये संभ्रम पसरला आहे. पर्याय शोधून प्लास्टिक बंद योग्य होते. शासनाच्या निर्णयामुळे विदर्भातील एक हजारांपेक्षा जास्त उद्योजकांवर संकट आल्याची माहिती विदर्भ प्लास्टिक इंडस्ट्रीज असोसिएशनचे सचिव प्रशांत अग्रवाल यांनी लोकमतशी बोलताना दिली.सरसकट बंदी उपाय नाहीअग्रवाल म्हणाले, केंद्र सरकारने एकल उपयोगाच्या प्लास्टिकवर सरसकट आणलेली बंदी हा उपाय ठरू शकत नाही. त्याचा पर्याय शोधून बंदी आणणे योग्य होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पूर्वी रस्ते बांधकामात १० टक्के प्लास्टिकचा उपयोग करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार कंत्राटदारांना बांधकामाचे कंत्राट देताना १० टक्के प्लास्टिचा उपयोग करण्यावर बंधन टाकले पाहिजे. त्यामुळे प्लास्टिकची समस्या सुटली असती. याशिवाय पेपरच्या रद्दीप्रमाणे टाकाऊ प्लास्टिकला भाव मिळाला असता तर लोकांनी प्लास्टिक घरीच गोळा केले असते. सरकारने डिजिटल आणि पेपरलेस कामावर भर दिला आहे. कागदी थैली वापरण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे वृक्षतोड वाढेल आणि पर्यावरणाचा ऱ्हास होईल, असे अग्रवाल म्हणाले.विदर्भात वार्षिक २५ हजार कोटींची उलाढालविदर्भात सर्व प्रकारच्या प्लास्टिकचे उत्पादन करणारे लहानमोठे एक हजारांपेक्षा जास्त कारखाने आहेत. महिन्याला २० हजार टन उत्पादनातून वार्षिक २५०० कोटींची उलाढाल होते. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकवर पूर्वी राज्य शासनाने बंदी आणल्यानंतर अनेकांनी या श्रेणीतील उत्पादन बंद केले होते. त्यामुळे अनेकांना तोटा सहन करावा लागला होता. बँकांच्या कर्जाचे हप्ते वाढल्याची उद्योजकांची ओरड होती. आता तीच बाब केंद्र सरकार करीत आहेत.अध्यादेशात स्पष्टता असल्यास कारखानदार उत्पादन बंद करतील आणि उद्योजकांची दिशा स्पष्ट होईल. यावर केंद्राने गांभीर्याने लक्ष द्यावे, असे अग्रवाल यांनी स्पष्ट केले. आज ज्वेलरी बॉक्स आणि सोनपापडी उद्योगात प्लास्टिकचा उपयोग होतो. याशिवाय धान्य भरण्याच्या बॅग निर्मितीचे अनेक कारखाने आहेत. यातील प्लास्टिक एकल उपयोगाचे आहेत. या प्लास्टिकवर बंदी येणार काय, असा सवाल अग्रवाल यांनी उपस्थित केला. मंदीतील उद्योगांना बाहेर काढण्यासाठी शासनाने पर्याय द्यावा, असे त्यांनी सांगितले.विक्रेत्यांमध्ये धास्ती, कागदाचा वापरसदर प्रतिनिधीने प्लास्टिक बंदीसंदर्भात नंदनवन आणि सक्करदरा येथील फळे आणि भाजीपाला बाजाराची पाहणी केली. नंदनवन येथील फळे विक्रेत्याने ग्राहकाला केळी वर्तमानपत्रात गुंडाळून दिली. फळांसाठी प्लास्टिक पिशवी कुणीही मागू नये, असा बोर्ड त्याने हातठेल्यावर लावला आहे. कागदी पिशवी महाग पडते. एक डझन केळीसाठी पिशवी देणे शक्य नाही. ग्राहकांनी खरेदीसाठी घरून निघताना कापडी पिशवी सोबत ठेवावी, असा सल्ला विक्रेत्याने दिला. सक्करदरा परिसरात भाजी आणि फळे विक्रेत्यांनी प्लास्टिक पिशवीवर बॅन टाकल्याचे दिसून आले. कारवाई झाल्यास दंड कोण भरणार, असा उपरोधिक सवाल विक्रेत्यांनी केला.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी