लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जनजागृती सोबतच मतदानासाठी येणाऱ्या मतदारांना मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, पंखे, शौचालयाची सुविधा राहील. मतदारांची कोणत्याही स्वरुपाची गैरसोय होणार नाही. असा दावा जिल्हा निवडणूक विभागातर्फे करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात मतदान केंद्रावर या सुविधा शोधूनही दिसल्या नाही. दुपारी उन्हाच्या तडाख्यात मतदानासाठी रांगेत असलेल्या लोकांना पाण्याविना राहावे लागले.पश्चिम नागपुरातील पोलीस लाईन टाकळी येथील पेन्शननगर प्राथमिक शाळेत मतदानाचे चार बूथ होते. या केंद्रावर दुपारी १२ च्या सुमारास मतदानासाठी लांब रांग लागली होती. दोन-अडीच तास नागरिक रांगेत उभे होते. उन्हामुळे पाण्यासाठी मतदार भटकत होते. येथे पिण्याच्या पाण्याची, शौचालय व पंखे यापैकी कोणतही सुविधा नव्हती. यामुळे रांगेत उभे असलेले नागरिक घामाघूम झाले होते.
उन्हाचा तडाखा अन् पाण्याचा पत्ता नाही : प्रशासनाच्या घोषणा कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 23:47 IST
लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जनजागृती सोबतच मतदानासाठी येणाऱ्या मतदारांना मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, पंखे, शौचालयाची सुविधा राहील. मतदारांची कोणत्याही स्वरुपाची गैरसोय होणार नाही. असा दावा जिल्हा निवडणूक विभागातर्फे करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात मतदान केंद्रावर या सुविधा शोधूनही दिसल्या नाही. दुपारी उन्हाच्या तडाख्यात मतदानासाठी रांगेत असलेल्या लोकांना पाण्याविना राहावे लागले.
उन्हाचा तडाखा अन् पाण्याचा पत्ता नाही : प्रशासनाच्या घोषणा कागदावरच
ठळक मुद्देपंखे नसल्याने मतदार उकाड्याने त्रस्त