शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

 लाखाच्या संख्येत असणाऱ्या धानाच्या प्रजाती आता अवघ्या ६ हजारांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 07:24 IST

Nagpur News सुमारे ४० ते ५० वर्षापूर्वी देशात धानाच्या १ लाख १० हजार प्रजाती होत्या. मात्र आता यातील अनेक नामशेष झाल्या असून असून देशभरात अवघ्या ६ हजारांपर्यंतच धानाच्या देशी जाती अस्तीत्वात आहे.

ठळक मुद्देदेशी वाण नामशेष होण्याच्या मार्गावर विदर्भात उरल्या फक्त २० जाती

गोपालकृष्ण मांडवकर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सुमारे ४० ते ५० वर्षापूर्वी देशात धानाच्या १ लाख १० हजार प्रजाती होत्या. मात्र आता यातील अनेक नामशेष झाल्या असून असून देशभरात अवघ्या ६ हजारांपर्यंतच धानाच्या देशी जाती अस्तीत्वात आहे. यामुळे या जातींचा शोध घेऊन त्यांचे संवर्धन न झाल्यास निसर्गाच्या मोठ्या अलौंकिक देणगीला मुकण्याची वेळ माणसावर येण्याची शक्यता आहे.

१०७०-७५ च्या दशकात संकरित बियाण्यांची पद्धत नव्हती. सर्व प्रकारचे देशी वाण शेतामध्ये पिकवले जायचे. मात्र हरित क्रांतीनंतर कृषी क्षेत्रात आमुलाग्र बदल झाले. देशाच्या कृषी उत्पादकता वाढीवर भर दिला गेला. नवे वाण संशोधनासोबतच देशात प्रयोगाशाळा उभ्या झाल्या. कृषी विद्यापिठांमधून संशोधित वाण बाहेर आल्याने शेतकरी नव्या वाणाकडे वळले. देशामध्ये रोजच्या जेवणात भाताचा वापर अधिक आहे. सध्या महाराष्ट्रात विदर्भ व कोकणसह, अन्य राज्यात फक्त ५ ते ६ हजार धानाच्या जाती उरल्या आहेत.

विदर्भात उरल्या २० जाती

विदर्भातील भंडारा, गोंदीया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिलह्यांमध्येही पूर्वी वेगवेगळ्या प्रकारचे तांदुळ पिकविले जायचे. मात्र आता विदर्भात फक्त २० जाती उरल्या आहेत. यात लुचई, पांढरी लुचई, पिवळी लुचई, काली कम्मोर, हिरानथी (तुळशीमंजुळा), दुबराज, काटेचिन्नोर, चिन्नोर, बासगिरा, गुरूमुखिया, लिलावती, काला भात, रक्तसाळ आदी जाती उरल्या आहेत. २०१४ पासून देशी वाण संकलित करण्याच्या महाराष्ट्र जनकोष प्रकल्पांच्या माध्यमातून उपक्रमाला चालना मिळायला लागल्याने काही मोजके शेतकरी या वाणांच्या लागवडीकडे आणि संवर्धनाकडे वळले आहे.

जीएमओने आणली गदा

मुळ वाणावर संशोधन करून नवे संकरित वाण बाजारात आणल्याने व त्याची उत्पदकता अधिक असल्याने शेतकरी मुळ वाणाला विसरले. जीएमओ अर्थात जणुकिय परावर्तीत पिके (जेनेटिकली मॉडिफाईट सीड्‌स) घेण्याकडे कल वाढला. सरकारकडून आणि बियाणे विक्रेत्या कंपन्याकडूनही यासाठी शेतकऱ्यांना अधिक प्रोत्साहन मिळायला लागल्याने नव्या संकरित वाणाचा वापर वाढला. पूर्वी प्रचलित असणारे वाण कमी उत्पादकतेचे होते. मात्र त्यात नैसर्गिक घटक, खनिजे होती. परंतु अधिक उत्पादकतेच्या हव्यासामुळे देशी वाण मागे पडले. कालांतराने नामशेष झाले.

प्रत्येंक धानाची वेगळी गुणवैशिष्ठ आहेत. नैसर्गिक खनिजे, घटक त्यात मुलत: आहेत. मुळ जाती नष्ट झाल्यास जैवविविधतेला धोका आहे. सध्या तयार झालेल्या संकरित आणि संशोधित जाती मुळ जातींवर तयार झाल्या आहेत. कालांतराने मुळ जाती नष्ट झाल्यास पर्यावरण आणि निसर्गाला मोठा धोका होण्याची शक्यता आहे.

- सुधीर धकाते, कृषी अभ्यासक, भंडारा

...

टॅग्स :agricultureशेती