शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

दवाखाने आहेत पण जनावरांचे डॉक्टरच नाही; जिल्ह्यातील पशुधन वाऱ्यावर

By गणेश हुड | Updated: May 6, 2024 20:10 IST

 श्रेणी १चे जिल्ह्यात ४१ तर श्रेणी २ ची १३०  पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. राज्य शासनाच्या ७९ दवाखन्यात २३६ पदे मंजूर असताना तब्बल १५८ पदे रिक्त आहेत. यात जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांचे पद सुध्दा रिक्त आहे.

 नागपूर  : दुष्काळी परिस्थितीत जनावरे वाचविण्यासाठी सरकारकडून कोट्यवधी रुपये खर्च करून चारा छावण्या सुरू केल्या जातात. दुसरीकडे  याच जनावरांच्या उपचारासाठी असलेल्या नागपूर जिल्ह्यातील  शासकीय व जिल्हा परिषदेच्या १५५ पशुवैद्यकीय दवाखन्यातील तब्बल ६८ टक्के पदे रिक्त असल्याने दवाखाने असूनही जनावरांना उपचार मिळत नसल्याने शेतकऱ्यांत संताप व्यक्त केला जात आहे. 

 श्रेणी १चे जिल्ह्यात ४१ तर श्रेणी २ ची १३०  पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. राज्य शासनाच्या ७९ दवाखन्यात २३६ पदे मंजूर असताना तब्बल १५८ पदे रिक्त आहेत. यात जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांचे पद सुध्दा रिक्त आहे. सहायक उपाययुक्तांची दोन पदे रिक्त आहेत. सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांची ७ पदे मंजूर असताना ६ पदे रिक्त आहेत. तर पशुपर्यवेक्षकांची मंजूर ८४ पदापैकी ६८ पदे रिक्त असल्याने दवाखान्यात उपचारासाठी आणलेल्या जनावरांवर उपचार होत नसल्याचे चित्र आहे. अनेक दवाखाने मागील  काही वर्षापासून   नियमित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रतीक्षेत आहे.परिसरातील शेतकऱ्यांच्या गुरांना यामुळे वेळेवर उपचार मिळत नसल्याने हा दवाखानाच आजारी झाले आहेत. पशुसंवर्धन खात्याच्या या अनागोंदी कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात असून पशुधन बाळगणाऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. कायमस्वरूपी स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी मिळविण्यासाठी अजून किती वर्ष प्रतीक्षा करावी लागणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.शासन निर्णयानुसार निर्देश नाही

 जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग, शासकीय दूध डेअरी आणि जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयांचा कारभार एकाच छताखाली करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग बंद होणार असून तेथील कर्मचारी जिल्हा परिषदेकडे वर्ग होणार असल्याची चर्चा आहे. परंतु यासंदर्भात जिल्हा परिषदेला अद्याप कुठलेही निर्देश प्राप्त झाले नसल्याची माहिती विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.