शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

घाटावर लाकडे नसतानाही दिल्याचे दाखविले

By admin | Updated: December 8, 2014 00:57 IST

महापालिकेत दहनघाटांवर अंत्यसंस्कारासाठी लाकूड पुरवठा करण्यात झालेला घोटाळा अंकेक्षण अहवालाने उजेडात आणला आहे. या अहवालात उघडकीस आलेले सत्य लाजिरवाणे तेवढेच संतापजनकही आहे.

मनपाची लूट : लाकडाच्या साठ्याची नोंदवहीत नोंदच नाही नागपूर : महापालिकेत दहनघाटांवर अंत्यसंस्कारासाठी लाकूड पुरवठा करण्यात झालेला घोटाळा अंकेक्षण अहवालाने उजेडात आणला आहे. या अहवालात उघडकीस आलेले सत्य लाजिरवाणे तेवढेच संतापजनकही आहे. दिघोरी घाटावर जळाऊ लाकडाचा साठा उपलब्ध नसतानाही प्रेत जाळण्यासाठी लाकूड दिल्याचे दाखवून त्याचे बिल घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे या संवेदनशील विषयावर कारवाई करण्यासाठी नागपूर महापालिका कुठलेही पाऊल उचलताना दिसत नाही, यावर सामाजिक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.अंकेक्षण अहवालात नमूद तपशिलानुसार दिघोही घाटावरील २०११-१२ च्या लाकूड साठा पुस्तकाची पडताळणी केली असता, साठा पुस्तक क्रमांक ६ वर जून २०११ अखेर २७१ किलो लाकूड शिल्लक असल्याचे दर्शविण्यात आले आहे. असे असतानाही २ जुलै २०११ ते २७ जुलै २०११ पर्यंत एकूण ११ प्रेतांवर अंत्यविधी करण्यासाठी ३.३०० टन लाकूड देण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे. प्रत्यक्षात घाटावर २८ जुलै २०११ रोजी १५ टन लाकडाचा पुरवठा करण्यात आल्याची नोंद आहे. असे असतानाही २ ते २७ जुलै २०११ दरम्यान घाटावर लाकूड उपलब्ध नसताना ११ प्रेते जाळण्यासाठी लाकूड कुठून दिले, असा आक्षेप अंकेक्षण अहवालात घेण्यात आला आहे. याशिवाय महेश सेल्स कॉर्पोरेशनने खरेदी केलेला लाकडाचा साठा व नोंदवहीतील नोंदी यात बरीच तफावत आहे. अंकेक्षकांनी केलेल्या पडताळणीत ही बाब समोर आली आहे. (प्रतिनिधी)एकाच पावतीवर दोन बिले दाखविली महेश सेल्स कॉर्पोरेशन यांनी एकाच क्रमांकाच्या पावतीवर पुरविलेल्या मालाची नोंद दोन बिलावर दर्शवून २९ हजार ९९१ रुपये उचलले आहेत. पावती क्रमांक ३३१६७ दि. २६ सप्टेंबर २०११ नुसार अंबाझरी घाटावर ११.१४५ टन लाकडाचा वाहन क्रमांक एमपी २२६/१७८९ द्वारे पुरवठा करण्यात आला. परंतु त्याची नोंद बिल क्रमांक ४४९ व ४५० या दोन्ही बिलात दाखवून २९ हजार ९९१ रुपयांची उचल केली आहे. अंकेक्षण अहवालात ही बाब चव्हाट्यावर आली आहे. मयताच्या लाकडात घोटाळा करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.