शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

- तर मग तिकीट कशासाठी पाठविले?

By admin | Updated: March 19, 2017 02:54 IST

कोणतेही ठोस कारण न देता ऐनवेळी कार्यक्रम स्थगित करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर

येचुरींनी केली विद्यापीठाची ‘पोलखोल’ : चर्चेपासून दूर पळणे कुलगुरूंचा भ्याडपणा नागपूर : कोणतेही ठोस कारण न देता ऐनवेळी कार्यक्रम स्थगित करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनावर कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व खासदार सीताराम येचुरी यांनी जोरदार हल्लाबोल केला. कार्यक्रमाची परवानगी घेतली नव्हती, असा कुलगुरूंनी कांगावा केला आहे. मग मला विमानाचे तिकीट कसे काय पाठविले, असा प्रश्न उपस्थित करीत येचुरी यांनी विद्यापीठाची पोलखोलच केली. कुलगुरूंचे वर्तन भ्याडपणाचे असल्याची त्यांनी टीका केली. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनातर्फे १८ व १९ मार्च रोजी दीक्षांत सभागृहात ‘भारतीय लोकशाहीचा ऱ्हास : आव्हाने आणि उपाय’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सीताराम येचुरी यांना मुख्य वक्ते म्हणून बोलावण्यात आले होते व याच्या पत्रिका छापण्यात आल्या. मात्र अचानक हा कार्यक्रम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचे कुलगुरूंनी फर्मान काढले. कार्यक्रमाची प्रशासकीय पूर्वपरवानगी घेण्यात आली नाही, असा दावा कुलगुरूंनी केला होता. शनिवारी त्याच विषयावर दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय येथील इतिहास विभागातर्फे येचुरी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना व भाषणादरम्यान येचुरी यांनी विद्यापीठाचे वाभाडे काढले. कुलगुरूंच्या परवानगीनंतरच मला निमंत्रण मिळाले. इतकेच काय मला विमानाचे तिकीटदेखील पाठविण्यात आले. असे असताना अचानक व्याख्यान स्थगित करण्यात आले. जर पूर्वपरवानगी नव्हती तर मला तिकीट कसे काय पाठविले, असा प्रश्न येचुरी यांनी उपस्थित केला. नेमका कार्यक्रम का रद्द करण्यात आला, याचे उत्तर तर कुलगुरूच देऊ शकतील. मात्र कुणाचा दबाव असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशाप्रकारे कारण न देता कार्यक्रम स्थगित करण्यामागे नक्कीच काही तरी गोम आहे, असे प्रतिपादन येचुरी यांनी केले.(प्रतिनिधी)