शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

-तर राष्ट्रवादीने काँग्रेसमध्ये विलीन व्हावे

By admin | Updated: May 25, 2016 02:32 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसला सल्ले देण्याची काहीही आवश्यकता नाही.

दिग्विजय सिंह : मोदी सरकार केवळ दिखावा करीत आहेनागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसला सल्ले देण्याची काहीही आवश्यकता नाही. जर त्यांना कॉंग्रेसची इतकीच काळजी वाटत असेल तर त्यांनी पक्षाला कॉंग्रेसमध्ये विलीन करावे, असे प्रतिपादन काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी केले आहे. सोनिया गांधी यांनी कॉंग्रेसचे अध्यक्षपद सोडल्यास चुकीचा संदेश जाईल असे वक्तव्य राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तारिक अन्वर यांनी केले होते. यावर सिंह यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना हे वक्तव्य केले.५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसची पिछेहाट झाल्यानंतर आता पक्षात ‘सर्जरी’ची आवश्यकता आहे. या मतावर मी आजही कायम आहे. कॉंग्रेसमध्ये तरुणांना जास्तीत जास्त प्रमाणात जोडण्याची आवश्यकता आहे, याचा पुनरुच्चार दिग्विजय सिंह यांनी केला. मोदी सरकारची दोन वर्षे पूर्ण होत आहेत, परंतु विकास मात्र कुठेच दिसला नाही. आता दोन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्लीला होणाऱ्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेते अमिताभ बच्चन करणार आहेत. केंद्र सरकारने कामे तर केलेली नाहीत, परंतु बच्चन यांचा उपयोग करुन स्वत:चा प्रचार-प्रसार करत आहेत. २६ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी या मतदारसंघात जाऊन मी तेथे खरोखर किती विकास झाला आहे, हे पाहणार असल्याचे त्यांनी सांगितले.राम नाईकांकडून अपेक्षाच नाहीउत्तर प्रदेशात बजरंग दलाकडून स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. यात शस्त्रे चालविण्याचेदेखील प्रशिक्षण देण्यात येत आहे. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी याला योग्य म्हटले होते. यावर दिग्विजय सिंह यांनी टीका केली आहे. बजरंग दल, संघ यांचे निर्माणच हिंसेतून झाले आहे. त्यांच्याशी जुळलेल्या राम नाईक यांच्याकडून इतर विचारांची अपेक्षा करूच शकत नाही, असे सिंह म्हणाले.मी माफी मागणार नाही‘बाटला एन्काऊन्टर’ बनावट होते या माझ्या वक्तव्यावर मी कायम आहे व यात माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, असे सिंह यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हायला हवी. त्यातून सर्व बाबी समोर येतील. मोठा साजिद, छोटा साजिद कोण आहेत, याची मला काहीही माहिती नाही, असेदेखील ते म्हणाले.