रोख आणि दागिने लंपास
नागपूर : गोळीबार चौकातील पटवी गल्लीत राहणारे दीपक प्रकाश पाटणकर (वय ३०) यांच्या घरातून चोरट्यांनी रोख आणि दागिने चोरून नेले.
पाटणकर यांच्या तक्रारीनुसार सोमवारी दुपारी ३ ते सायंकाळी ५ च्या दरम्यान चोरीची ही घटना घडली. त्यांच्या घरातील कपाटात असलेले रोख १८ हजार रुपये आणि सोन्या चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले.
तहसील पोलिसांनी पाटणकर यांच्या तक्रारीवरून चोरीचा गुन्हा दाखल केला. चोरट्याचा शोध घेतला जात आहे.
---