शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

शल्यचिकित्सकाएवढीच फिजिओथेरपीस्टची भूमिका महत्त्वाची

By सुमेध वाघमार | Updated: April 8, 2024 19:27 IST

तज्ज्ञाचा सूर : मेडिकलच्या फिजीओथेरपी स्कूल अ‍ॅण्ड सेंटरचा पदवीदान सोहळा

नागपूर : अपघातात जखमीला  पूर्णत: बरे करण्याची जेवढी शल्यचिकित्सकाची भूमिका महत्त्वाची असते तेवढीच महत्त्वाची भूमिका फिजीओथेरपीस्टची असते. शल्यक्रिया १०० टक्के यशस्वी झाली तरी त्या रुग्णाचे आजारातून पुनर्वसनकरण्याची मोठी जबाबदारी फिजीओथेरपीस्टची असते, असा सूर तज्ज्ञाचा होता. 

      मेडिकलच्या फिजीओथेरपी स्कूल अ‍ॅण्ड सेंटरचा पदवीदान सोहळा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) सभागृहात पार पडाला. यावेळी मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशीकच्या अलाइड हेल्थ फॅकल्टीचे अधिष्ठाता डॉ. वाय. प्रवीण, मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, ‘आयएमए’च्या अध्यक्ष डॉ. मंजुषा गिरी, मेडिकलमधील आॅक्युपेश्नल स्कूल अ‍ॅण्ड सेंटरच्या प्राचार्य डॉ. सोफिया आझाद व मेडिकलच्या फिजीओथेरपी स्कूल अ‍ॅण्ड सेंटरच्या प्राचार्य डॉ. उमांजली दमकेउपस्थित होत्या. या सर्वांनी फिजीओथेरपीस्टचे महत्त्व विषद केले. या सोहळ्यात ‘एमपीटीएच’ कार्डिओरेस्पिरेटरीच्या दोन तर ‘बीपीटीएच’च्या २७ विद्यार्थ्यांना चांगल्या व्यावसायिक आचरणाची आणि समाजाची नि:स्वार्थ सेवा करण्याची शपथ देण्यात आली.

-मेडिकलचे विद्यार्थी रुग्णांना हाताळण्यास सक्षमडॉ. दमके यांनी महाविद्यालयाने राबविलेले वार्षिक उपक्रमाची माहिती दिली. त्या म्हणाल्या, फिजिओथेरपी विभागात ‘आयसोकिनेटिक’ उपकरण आहे, जे जखमी खेळाडुंच्या पुनर्वसनासाठी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या संशोधनासाठी महत्वाचे ठरत आहे. कॉलेजने  ‘आयसोकिनेटिक ह्युमॅक नॉर्म’वर अनेक अभ्यास केले आहेत. या शिवाय अनेक महत्त्वाची उपकरण विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. येथील पदव्युत्तर विद्यार्थ्यांची प्रशिक्षणासाठी एनआयसीयू, पीआयसीयू, एसआयसीयू, सीव्हीटीएस, आयसीयू, श्वसनरोग विभागात नेमणूक केली जाते. यामुळे मेडिकल फिजिओथेरपीमधून पदवीधर झालेला विद्यार्थी जगात कुठेही कोणत्याही प्रकारच्या फिजिओथेरपी रुग्णांना हाताळण्यास सक्षम असतो.

टॅग्स :Medicalवैद्यकीय