शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

‘सेल्फोस’ विष घेतल्याने मृत्यूचा दाढेत अडकलेल्या तरुणाचा वाचला जीव

By सुमेध वाघमार | Updated: May 16, 2024 20:17 IST

-मध्य भारतातील पहिलेच प्रकरण : अ‍ॅल्युमिनियम फॉस्फाईड विषामुळे ९५ टक्के मृत्यूचा धोका.

नागपूर : किडे लागू नये म्हणून तांदळात ठेवले जाणारे ‘सेल्फोस’ म्हणजे ‘अ‍ॅल्युमिनियम फॉस्फाईड’ खाल्याने ३६ वर्षीय तरुण मृत्यूच्या दाढेत अडकला होता. या विषावर उपचार नाही. ९५ टक्के मृत्यूचा धोका होता. परंतु क्रिटीकल केअर तज्ज्ञ डॉ. राजेंद्र चांडक यांनी आपल्या अनुभव व कौशल्याचा बळावर नवीन उपचार पद्धतीने रुग्णाचे प्राण वाचविले. या विषातून बरा झालेला मध्यभारतातील हे पहिले प्रकरण असावे, असेही त्यांचे म्हणणे होते. 

छिंदवाडा येथील ३६ वर्षीय तरुण प्रमोद हिवाडे याने चुकून ‘सेल्फोस’ या जहाल विषाचा दोन पुड्याचे सेवन केले. त्याचा कुटुंबियाने तातडीने त्याला नागपुरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉ. चांडक यांनी प्रमोदला तापासले असता त्याची प्रकृती गंभीर झाली होती. ईसीजीच्या अहवालावरून त्याचे हृदय कधीही बंद पडण्याची शक्यता होती. पुढील ७२ तासांत मृत्यूचा धोका होता. या विषावर उपचार नसल्याने शरीरातून विष काढून जीव वाचविण्याचा एकच पर्याय होता. त्यासाठी त्यांनी रुग्णांच्या नातेवाइकांकडून परवानगी घेतली. त्यानंतर पुढील १६ तास शर्थीच्या उपचार करून रुग्णाचा जीवाचा धोका टाळला. 

-हृद्य, फु फ्फुस, किडनीला होता धोकाया प्रकरणाची माहिती देण्यासाठी गुरुवारी आयोजित पत्रपरिषदेत डॉ. चांडक म्हणाले, ‘सेल्फोस’ या गोळ्याचा वापर तांदळात किडे लागू नये म्हणून घराघरात होतो.  प्रमोदने या विषाचे २० ग्रॅमचा दोन पुड्याचे सेवन केले होते. या गोळ्या ओलाव्याचा संपर्कात येताच गॅस निर्माण होतो. गॅसमुळे रक्तातील पेशीमधील आॅक्सीजन बाधित होतो.  परिणामी, हृद्य, फुफ्फुस, किडनीसह इतरही अवयवाचे काम करणे हळूहळू बंद होते. मात्र रुग्ण उपचाराचा ‘गोल्डन अव्हर’ म्हणजे ६ तासात आला होता. यामुळे पर्यायी उपचाराचा निर्णय घेतला.

-रक्त फिल्टर केले, नवीन रक्त चढवले डॉ. चांडक म्हणाले, रुग्णाचा शरीरातू विष बाहेर काढण्यासाठी रक्त फिल्टर करणे म्हणजे ‘हिमोडायलिसीस’ देणे, नवीन रक्त चढविणे आणि शौचातून विष बाहेर काढणे ही उपचार पद्धती वापरली. सलग १६ तास ही उपचार पद्धती दिली. या दरम्यान त्याचा रक्तदाब कमी किंवा जास्त होऊ नये म्हणून डॉक्टरांची एक चमू लक्ष ठेवून होती. या शर्थीच्या उपचाराने हळूहळू रुग्ण बरा होऊ लागला. आठ दिवसानंतर त्याला आज गुरुवारी सुटी देण्यात आली. 

-या डॉक्टरांच्या चमूचा प्रयत्नाला आले यशडॉ. राजेंद्र चांडक यांच्यासह डॉ. एस. डी. सूर्यवंशी, डॉ. किरण पटेल, डॉ. आर. गणेश, डॉ. संजय मानकर, डॉ. गौरव बनसोड, डॉ. सुनील बंगाल व ललीत खोब्रागडे या डॉक्टरांच्या चमूचा प्रयत्नाला यश आले.

टॅग्स :nagpurनागपूर