शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

 अर्धवट काम करण्याचा बेजबाबदारपणा कंत्राटदाराला भोवला; जागरूक नागरिकाची पोलिसांत तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2023 22:01 IST

Nagpur News रस्ताचे काम झाल्यानंतर अनेकदा कंत्राटदाराकडून रेती-गिट्टी व इतर मलबा उचलण्यात येत नाही व त्यातून अपघात घडतात. मात्र नागपुरातील एका जागरूक नागरिकाने भावाच्या अपघातानंतर कंत्राटदाराविरोधात थेट पोलिसांत तक्रार दिली.

नागपूर : रस्ताचे काम झाल्यानंतर अनेकदा कंत्राटदाराकडून रेती-गिट्टी व इतर मलबा उचलण्यात येत नाही व त्यातून अपघात घडतात. बहुतांश नागरिकांकडून असेच चालत आहे असे म्हणत अशा प्रकारांकडे दुर्लक्ष करण्यात येते. मात्र नागपुरातील एका जागरूक नागरिकाने भावाच्या अपघातानंतर कंत्राटदाराविरोधात थेट पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनीदेखील प्राथमिक चौकशी करत राजश्री कंस्ट्रक्शन कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सुधीर हाडगे (३८, श्रीकृष्णनगर) असे संबंधित जागरूक नागरिकाचे नाव आहे. २५ फेब्रुवारी रोजी त्यांचे मोठे बंधू सुशील हाडगे (४२, श्रावणनगर) यांचा अपघात झाला. रात्री कार्यालयातून घराकडे परतत असताना राजेंद्रनगर चौकात रस्त्यावर असलेल्या रेती-गिट्टीवरून त्यांची दुचाकी घसरली व त्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना जवळपास तीन आठवडे रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. सुधीर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तेथे रस्त्याचे बांधकाम सुरू होते व कंत्राटदाराने तेथील रेती-गिट्टी उचलत रस्ता साफ करण्याची तसदी दाखवली नव्हती. शिवाय सुरक्षेचे तसेच धोक्याची सूचना देणारे फलकदेखील नव्हते. कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणामुळेच हा अपघात झाल्याची तक्रार त्यांनी नंदनवन पोलीस ठाण्यात नोंदविली. पोलिसांनी राजश्री कंस्ट्रक्शन या कंत्राटदाराविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

नागरिकांनी जाब विचारण्याची गरजशहरातील अनेक ठिकाणी सार्वजनिक रस्त्यांची कामे सुरू आहेत. बरीच कामे अर्धवट असून काही ठिकाणी अशाच पद्धतीने सामान व मलबा पडून आहे. नागरिकांनी यासंदर्भात मनपाच्या झोन कार्यालयांत तक्रारी करत कंत्राटदाराला जाब विचारण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. कंत्राटदारांच्या बेजबाबदारपणामुळे नागरिकांचा जीव धोक्यात येऊ शकतो.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा