शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

तोतयेगिरी करणाऱ्या कॅलिफोर्नियातील डॉक्टर प्रांजल वाघळेला हायकोर्टाचा दणका

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: March 3, 2023 13:20 IST

एफआयआर रद्द करण्याची विनंती नामंजूर

नागपूर : नातेवाईक महिलेला एका गुन्ह्यातून वाचविण्यासाठी पंतप्रधान कार्यालयात कार्यरत असल्याचे सांगून पोलिस अधिकाऱ्यांवर दबाव आणणारा अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे कार्यरत डॉक्टर जिजस ऊर्फ प्रांजल रमेश वाघळे (३६) याला गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा दणका बसला. न्यायालयाने त्याची एफआयआर रद्द करण्याची विनंती नामंजूर केली व त्याचा संबंधित अर्ज फेटाळून लावला.

न्यायमूर्तीद्वय विनय जोशी व वाल्मीकी मेनेझेस यांनी हा निर्णय दिला. ९ मार्च २०२२ रोजी बेलतरोडी पोलिसांनी वाघळेविरुद्ध भादंविच्या कलम ४१९, १७०, १७७, १८२, १८९ अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. वाघळेची नातेवाईक कामिनी ऊर्फ प्रिया संजय वैरागडे ही शस्त्राने जखमी करण्याच्या गुन्ह्यात आरोपी आहे. तिला या गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी वाघळे १९ जानेवारी २०२२ रोजी अजनी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त, परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त व बेलतरोडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना वेगवेगळ्या वेळी भेटला.

दरम्यान, त्याने तो पंतप्रधान कार्यालयात कार्यरत असल्याचे सांगून तिन्ही पोलिस अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांनी गुन्ह्याचा कायद्यानुसार तपास केला जाईल, अशी भूमिका घेतल्यानंतर वाघळेने त्यांना पाहून घेण्याची धमकी दिली. दरम्यान, पोलिसांनी चौकशी केली असता वाघळे पंतप्रधान कार्यालयात कार्यरत नसल्याची माहिती मिळाली, अशी तक्रार आहे. न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड. संजय डोईफोडे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालयfraudधोकेबाजीdoctorडॉक्टर