शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

अखेर मुख्यमंत्री, मंत्रीदेखील लोकायुक्तांच्या कक्षेत

By योगेश पांडे | Updated: December 15, 2023 20:45 IST

भ्रष्टाचाराच्या प्रकरणात कारवाईचे अधिकार : विधानपरिषदेत लोकायुक्त विधेयकाला एकमताने मंजुरी

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : जुन्या लोकायुक्त कायद्यानुसार लोकायुक्तांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणांत थेट कारवाईचा कुठलाही अधिकार नव्हता. मात्र आता लोकायुक्तांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणांसोबतच अगदी मुख्यमंत्री, मंत्री किंवा इतर लोकप्रतिनिधींवर कारवाईचा अधिकारदेखील मिळणार आहे. मागील वर्षी विधानसभेत मंजूर झालेल्या लोकायुक्त विधेयकाला शुक्रवारी विधानपरिषदेत एकमताने मंजुरी देण्यात आली. या कायद्यात आता भ्रष्टाचार प्रतिबंधक तरतुदींचा समावेश झाला आहे. केंद्रातील लोकपाल कायद्यानंतर महाराष्ट्रात लोकायुक्त कायदा व्हावा हा समाजसेवक अण्णा हजारे यांचा आग्रह होता. त्यांचा समावेश असलेल्या समितीचा मसुदा कुठलाही बदल न करता विधेयकाच्या माध्यमातून मांडण्यात आला होता हे विशेष.

राज्यातील लोकायुक्त कायदा जुना असून त्यात भ्रष्टाचार निर्मूलन कायद्याच्या तरतुदींचा समावेशच नाही. लोकायुक्तांना ठोस कारवाईचे अधिकार नव्हते.राज्यातील नागरिकांना भ्रष्टाचाराच्या विरोधात तक्रार करता यावी यासाठी राज्यात सक्षम लोकायुक्त कायदा असणे आवश्यक असल्याची मागणी अण्णा हजारेंनी केली होती. अण्णा हजारे यांनी उपोषण केले होते व त्यानंतर एक संयुक्त समिती तयार करण्यात आली होती. त्यात अण्णा हजारेदेखील होते. अण्णांच्या मंजुरीनंतर तयार झालेला मसुदा विधेयकाच्या माध्यमातून मांडण्यात आला होता.

मागील वर्षी विधानसभेत याबाबतचे विधेयक मंजुर झाले होते. त्यानंतर त्यात सुधारणेसाठी दोन्ही सभागृहांची संयुक्त समिती गठीत करण्यात आली होती. त्या समितीचा अहवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी परिषदेसमोर मांडला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कायद्यातील तरतुदींवर प्रकाश टाकला. केंद्राच्या कायद्याच्या धर्तीवरच या लोकायुक्त कायद्यात बदल करण्यात आले आहेत. विधेयकामुळे मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री आणि लोकप्रतिनिधी लोकायुक्तांच्या छाननीखाली येतील. तसेच भ्रष्टाचाराच्या प्रकरणात आता लोकायुक्तांना संबंधित दोषींवर थेट कारवाई करता येणार आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. फडणवीस यांनी या विधेयकाबाबत माहिती दिल्यानंतर मंत्री दीपक केसरकर यांनी विधेयक मंजुरीसाठी सभागृहासमोर मांडले. सभागृहाने एकमताने याला मंजूर केले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य भाई जगताप, सचिन अहिर यांनी काही सूचना देऊन या विधेयकाला पाठिंबा दिला.

- लोकायुक्तांची निवड पारदर्शक पद्धतीनेच

लोकायुक्तांच्या निवडीत पारदर्शकता ठेवण्यात आली आहे. निवड समितीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानपरिषदेचे सभापती, विधानसभेचे अध्यक्ष, दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांचा समावेश असेल. त्यामुळे लोकायुक्तांची निवड कुणाच्याही दबावाशिवाय व पात्रतेच्या आधारवरच होईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केली.

- लोकायुक्तांना चौकशीसाठी घ्यावी लागणार परवानगी

- कुठल्याही लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्याविरोधात कारवाईसाठी परवानगीची आवश्यकता आहे. जर आमदाराविरोधात लोकायुक्तांकडे तक्रार आली तर लोकायुक्त प्राथमिक चौकशी करतील. जर तक्रारीत तथ्य असेल तर कारवाईसाठी सभागृहाचे अध्यक्ष किंवा सभापतींची परवानगी घ्यावी लागेल. त्यानंतर लोकायुक्तांना अंतिम चौकशी करावी लागेल. जर त्यानंतर समोरील आमदाराविरोधात खटला दाखल करणे आवश्यक आहे असे वाटले तर त्याचीदेखील परवानगी घ्यावी लागेल.

- जर एखाद्या मंत्र्याविरोधात तक्रार आली तर लोकायुक्तांना चौकशीसाठी राज्यपालांची परवानगी घ्यावी लागेल व त्यानंतर कारवाई करता येईल.- जर मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार आली तर चौकशीसाठी लोकायुक्तांना सभागृहाची परवानगी घ्यावी लागेल- लोकायुक्तांकडे खोटी तक्रार केल्यास तक्रारदारावर कडक कारवाईची तरतूद-

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन