शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

‘भावी मुख्यमंत्र्यां’चे ‘ते’ पोस्टर अन् फडणवीसांचे खडे बोल

By योगेश पांडे | Updated: April 26, 2023 08:10 IST

Nagpur News नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी येथे चक्क माजी मुख्यमंत्री व वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच ‘भावी मुख्यमंत्री’ असल्याचे पोस्टर लावण्यात आले. फडणवीस या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर पोस्टर लगेच काढण्यात आले. 

योगेश पांडे नागपूर : राज्यात मागील काही कालावधीपासून भावी मुख्यमंत्रिपदाच्या पोस्टर्सवरून चांगलेच राजकारण झाल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीतील पोस्टरबाजी थांबल्यावर आता भाजपच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी असे पोस्टर्स लावले आणि नव्या चर्चेला सुरुवात झाली. नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी येथे चक्क माजी मुख्यमंत्री व वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच ‘भावी मुख्यमंत्री’ असल्याचे पोस्टर लावण्यात आले. फडणवीस या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर पोस्टर लगेच काढण्यात आले. 

भाजपचा स्थानिक पदाधिकारी असलेल्या बबलू गौतम याने ते पोस्टर लावले. त्यात ‘संपूर्ण महाराष्ट्राचा ज्यांनी विकास घडविला, फक्त आणि फक्त तेच महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री होणार’ असे पोस्टरवर नमूद होते. सोशल माध्यमांमध्येदेखील हा फोटो आला. ही माहिती थेट देवेंद्र फडणवीस यांनादेखील कळाली. यावरून राजकारण तापून काय काय प्रतिक्रिया येऊ शकतात, याची जाण असल्याने फडणवीस यांनी त्यांच्या शैलीत पदाधिकाऱ्याला ‘ऑन कॅमेरा’च सुनावले. ज्या कोणी लावले त्यांनी ते काढून टाकावेत. कमीत कमी भाजपमध्ये तरी असा मूर्खपणा कुणी करू नये, अतिउत्साही लोकं असतात, तेच असं करतात. मात्र, एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्यात नेतृत्त्वात आम्ही २०२४ च्या निवडणुका लढवू, असे स्पष्ट केले. यानंतर संबंधित पदाधिकाऱ्याने तडकाफडकी पोस्टर तर काढले व आता ‘क्या करे क्या ना करे’ अशा विचारात तो इतर पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेत आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस