शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

फुकेंच्या मागणीला ठाकरेंचा दुजोरा

By admin | Updated: July 21, 2016 02:07 IST

महापालिकेतर्फे चालविण्यात येत असलेल्या बायोमेडिकल वेस्ट डिस्पोजल केंद्र मे. सुपर्ब हायजेनिक डिस्पोजल या कंत्राटदाराला देण्यात आले आहे

महापौरांचे चौकशीचे निर्देश : बायोमेडिकल वेस्ट डिस्पोजलमध्ये अनियमितता नागपूर : महापालिकेतर्फे चालविण्यात येत असलेल्या बायोमेडिकल वेस्ट डिस्पोजल केंद्र मे. सुपर्ब हायजेनिक डिस्पोजल या कंत्राटदाराला देण्यात आले आहे. बायोमेडिकलची ४८ तासांच्या आत विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. परंतु यात मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याने महापालिका प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी नगरसेवक परिणय फुके यांनी बुधवारी सर्वसाधारण सभेत केली. विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांनीही त्यांच्या मागणीला दुजोरा देत, या प्रकरणाच्या संपूर्ण नस्तीची चौकशी करण्याची मागणी केली. नागपूर शहरात ६३० हॉस्पिटल असून ९४१९ बेड आहेत. या हॉस्पिटलमधील बायोमेडिकल गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्याचा कंत्राट मे. सुपर्ब हायजेनिक या कंपनीला देण्यात आला आहे. परंतु बायोमेडिकलची योग्यप्रकारे विल्हेवाट लावली जात नाही. कंत्राटाच्या बदल्यात महापालिकेला २३ लाख ५० हजारांची रॉयल्टी वर्षाला मिळत आहे. यात दरवर्षी १० टक्के वाढ केली जाते. अतुल झोटिंग हे या कंपनीचे डायरेक्टर आहेत. २००४ साली या कंपनीला ३० वर्षांसाठी कंत्राट देण्यात आले आहे. सुरुवातीला मनोज गोलावार व त्यांच्या पत्नी या कंपनीचे संचालक होते. परंतु २०१२ मध्ये ते या कंपनीतून बाहेर पडले आहेत. आता अतुल झोटिंग, अतुल थुटे व विजय चौधरी संचालक असल्याची माहिती आरोग्य अधिकारी प्रदीप दासरवार यांनी प्रश्नाच्या उत्तरात दिली. प्लास्टिक वेस्टचा पुनर्वापर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अनुमतीशिवाय करता येत नाही. कंपनीने अनुमतीपत्र जोडलेले नाही. तसेच शासन अनुमतीशिवाय कंत्राट देता येतो का, असा मुद्दा फु के यांनी उपस्थित केला होता. या प्रस्तावाला शासन अनुमती असल्याची माहिती दासरवार यांनी दिली. उपमहापौर सतीश होले यांनी बायोमेडिकल वेस्ट डिस्पोजल कारखान्यावर छापा घातला. परंतु यात त्यांना काही आढळून आले का. महापौर व उपमहापौरांनी जनतेच्या हितासाठी अशा कारवाया करायलाच हव्यात. मी महापौर असताना छापा घालून गैरव्यवहार उघडकीस आणला होता. १२ अधिकाऱ्यांना निलंबित केले होते. अशा स्वरूपाच्या कारवाया व्हायलाच हव्यात, अशी भूमिका ठाकरे यांनी मांडली. या प्रकरणाची चौकशी करून पुढील सभेत चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश महापौर प्रवीण दटके यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले. (प्रतिनिधी)