शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
7
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
8
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
9
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
10
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
11
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
13
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
14
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
15
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
16
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
17
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
18
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
19
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

ठाकरे -जिचकार यांच्यात फ्रीस्टाईल!

By admin | Updated: April 27, 2016 02:55 IST

काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे आणि काँग्रेसचे नेते नरेंद्र जिचकार यांच्यात मंगळवारी सकाळी नागपूर...

विमानतळावर एकमेकांना मारहाण: मनपातील भ्रष्टाचाराची खदखद नागपूर : काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे आणि काँग्रेसचे नेते नरेंद्र जिचकार यांच्यात मंगळवारी सकाळी नागपूर विमानतळावर झालेल्या जबर फ्रीस्टाईलची दिवसभर राजकीय वर्तुळात चर्चा होती. स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी सकाळी ही घटना घडली. विकास ठाकरे आणि नरेंद्र जिचकार हे सकाळी ९.२० वाजता गो-एअर विमानाने मुंबईला जाणार होते. तत्पूर्वी लाऊं जमध्ये त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आणि ठाकरे यांचे मित्र मनोज गोलावार उभे होते. स्थानिक राजकारणावर चर्चा सुरू असताना अचानक ठाकरे आणि जिचकार यांच्यात भांडण सुरू झाले.आणि काही क्षणातच त्यांनी एकमेकांना शिवीगाळ व मारहाण सुरू केली. या प्रकाराने विमानतळावरील इतर प्रवाशांना धक्काच बसला. सारेजण अवाक् होऊ न हा प्रकार पाहात होते. पण काही वेळानंतर इतर मित्रांनी मध्यस्थी करून त्यांच्यातील भांडण सोडविले. या प्रकाराची कुणकु ण लागताच केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान तिथे पोहचले. परंतु हे प्रकरण शांत झाल्याचे सांगून हा वाद तिथेच मिटविण्यात आला. या घटनेनंतर ठाकरे आणि जिचकार एकाच विमानाने मुंबईला निघून गेले. दरम्यान या घटनेचे पडसाद स्थानिक राजकीय क्षेत्रात दिवसभर उमटले. ठाकरे आणि जिचकार यांच्यातील हा वाद फार जुना असून आजच्या मारहाणीच्या घटनेनंतर तो अधिकच चिघळण्याची भीती राजकीय क्षेत्रात वर्तवली जात आहे. (प्रतिनिधी)भ्रष्टाचार उघड केल्याने जिचकार भडकलेमहापालिकेत स्टार बस व जेट पॅचर घोटाळा आपण उकरून काढला. या दोन्ही घोटाळ्यात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. जेट पॅचर घोटाळ्यात नरेंद्र जिचकार सामील आहेत तर स्टार बस घोटाळ्याशी वंश निमयचे संचालक अजय ढवंगळे हे नरेंद्र जिचकार यांचे जावई आहेत. महापालिका सभागृहात हे दोन्ही घोटाळे मांडून जनतेच्या पैशाची लूट करणाऱ्यांवर कारवाई करावी. गुन्हे दाखल करावे, अशी मागणी आपण वारंवार केली आहे. स्थानिक वृत्तपत्रात यासंबंधीच्या बातम्याही प्रकाशित झाल्या आहेत. जनतेच्या पैशाची लूट थांबविणे हे विरोधी पक्षनेता म्हणून माझे कर्तव्य आहे. या दोन्ही घोटाळ्यावर आपण मौन बागळगावे यासाठी नरेंद्र जिचकार यांनी वेळोवेळी माझ्या घरी येऊ न मला गळ घातली. मी तरीही आवाज उठवत राहिलो, म्हणून त्यांनी इकडून-तिकडून निरोप पाठविले. आज सकाळी विमानतळावर नरेंद्र जिचकार यांनी तेच मुद्दे उकरून काढत वाद घातला. मी भ्रष्टाचार दाबणार नाही, अशी भूमिका कायम ठेवली असता जिचकार हे भडकले व शिवीगाळ करू लागले. अशा वागणुकीतून धमकावून ते माझा आवाज दाबू शकत नाही. जेट पॅचर घोटाळा व स्टार बस घोटाळ्यातील आरोपींना जेलची हवा खायला लावल्याशिवाय आपण शांत बसणार नाही. एक दिवस सत्याचा विजय होईल.- विकास ठाकरे, विरोधी पक्षनेते महापालिका, नागपूर वारंवार थट्टा सहन करणार नाहीराजकारणात मोठ्या पदावर आहे. याचा अर्थ त्यांनी एखाद्या कार्यक र्त्याची वारंवार थट्टामस्करी करून त्रास द्यावा, असा होत नाही. ठाकरे हे नेहमी अशी थट्टा करून त्रास देतात. महापालिका निवडणुकीतील उमेदवारीवरून त्यांनी थट्टा केली. नेहमी अशी थट्टा सहन करणे शक्य नाही. काही लोकांच्या उमेदवारीच्या बाबतीत त्यांनी हेच केले होते. परंतु अपक्ष म्हणून निवडणूक लढवून विजयी झालो. मी व माझे कुटुंबीय काँग्रेससोबत जुळलेले आहोत. एखाद्या पदाचा एवढा गर्व करू नये. - नरेंद्र जिचकार