लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: द ग्रेट पिजंट कम्युनिटी मिस इंडिया २०१९ या ऑनलाईन ब्युटी कॉन्टेस्टमध्ये नागपुरात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या सिमरन करवा या विद्यार्थिनीची वर्णी लागली आहे. संपूर्ण भारतातून आलेल्या प्रवेशिकांमधून निवडण्यात आलेल्या २५ प्रवेशिकांमध्ये सिमरन करवा आहे.टीजीपीसी या ग्रूपतर्फे ही स्पर्धा घेण्यात येत असते. यंदाचे या स्पर्धेचे सहावे वर्ष आहे. यात सर्व काही ऑनलाईन करायचे असते. स्पर्धेत सहभागी होण्यापासून ते विविध टप्पे पार पाडण्याचा प्रवास ऑनलाईन होतो. यात स्पर्धकांना स्पर्धेसाठी निर्धारित पद्धतीने काढलेले आपले काही व्हिडिओज पाठवायचे असतात. दररोज एक प्रश्न विचारला जातो. यात अंतरिम बजेटपासून ते सामाजिक सेवेपर्यंतच्या प्रश्नांचा समावेश असतो.सिमरन करवा हिने या स्पर्धेत भाग घेतला असून तिची पहिल्या २५ स्पर्धकांमध्ये निवड करण्यात आली आहे. यातील पुढच्या टप्प्यात १० स्पर्धक निवडले जाणार आहेत. सरतेशेवटी तीन स्पर्धकांची निवड होऊन त्यातून प्रथम, द्वितीय व तृतीय असे क्रमांक काढण्यात येतील. या विजेत्या स्पर्धकांना मुंबईत आयोजित एका सोहळ््यात मिस इंडिया ऑनलाईनचा मुकूट चढविला जाईल.सिमरन ही नागपुरातील व्हिएनआयटीमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेते आहे. तिने या स्पर्धेसाठी बरीच मेहनत घेतली आहे. यात तिला तिची आई स्वाती यांचे मोठे सहकार्य व पाठिंबा असल्याचे ती सांगते.
टीजीपीसी ऑनलाईन मिस इंडिया कॉन्टेस्टमध्ये नागपूरच्या सिमरनची वर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 14:03 IST
द ग्रेट पिजंट कम्युनिटी मिस इंडिया २०१९ या ऑनलाईन ब्युटी कॉन्टेस्टमध्ये नागपुरात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या सिमरन करवा या विद्यार्थिनीची वर्णी लागली आहे.
टीजीपीसी ऑनलाईन मिस इंडिया कॉन्टेस्टमध्ये नागपूरच्या सिमरनची वर्णी
ठळक मुद्देसबकुछ होते ऑनलाईनमिस इंडियाचा क्राऊन बहाल करण्याचा सोहळा मुंबईत