शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पाठ्यपुस्तकांच्या किंमती वाढणार; विक्रेते अन् प्रकाशकांची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 12:32 IST

शाळा आणि महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना यापुढे नोट्स किंवा गाईड्सचा आधार घ्यावा लागणार आहे. कारण, पाठ्यपुस्तकांना जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याने ही पुस्तके महाग होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देपुस्तकांना जीएसटीच्या कक्षेत आणण्याची केंद्राची तयारी

आशिष दुबे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शाळा आणि महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना यापुढे नोट्स किंवा गाईड्सचा आधार घ्यावा लागणार आहे. कारण, पाठ्यपुस्तकांना जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याने ही पुस्तके महाग होण्याची शक्यता आहे.‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, १५ दिवसांपूर्वी या संदर्भात दिल्लीतील पुस्तक प्रकाशन संस्था आणि विक्रेत्यांना नोटीस मिळाली आहे. यामुळे विक्रेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. केंद्र सरकार पाठ्यपुस्तकांवर ६ ते १२ टक्के जीएसटी लावण्याच्या विचारात आहे. या संदर्भात विचारमंथन सुरू असून लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. असे झाले तर शालेय पुस्तके घेऊन अभ्यास करणे सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या आवाक्याबाहेरचे होईल, असे पुस्तक विक्रेते व प्रकाशकांचे मत आहे. आधीच केंद्र सरकारने छपाई, कागद, बार्इंडिंग आदींना जीएसटीमध्ये टाकले आहे. यामुळे यंदा पुस्तके महागली आहेत.पुस्तक विक्रेत्यांच्या मते, मागील वर्षी अकरावी विज्ञान या वर्गाच्या पुस्तकांच्या सेटची किंमत ६०० रुपये होती. यंदा त्यात वाढ होऊन ९०० रुपये किंमत झाली आहे. पाठ्यपुस्तके जीएसटीमध्ये आली तर या संचाची किंमत १ हजार १०० रुपये ते १ हजार ५० रुपयांवर जाऊ शकते. अशीच स्थिती अन्य इयत्तांच्या पुस्तकांसंदर्भात आहे. फक्त राज्य शिक्षण मंडळच नव्हे तर सीबीएसई, आयसीएसई बोर्ड व विद्यापीठांच्या पाठ्यपुस्तकांवरही याचा परिणाम पडू शकतो. पुस्तके महागल्याने पालक विक्रेत्यांना दोषी धरत आहेत. विक्रीत घट झाल्याने हा व्यवसाय बंद करण्याची पाळी येते की काय अशी चिंता विक्रेत्यांना पडली आहे.

जुन्या पुस्तकांची मागणी वाढलीपुस्तकांचे दर वाढल्याने नवीन पुस्तके खरेदी करण्याऐवजी पालक जुन्या पुस्तकांची मागणी करीत आहेत. मागील २० दिवसात ही मागणी वाढली आहे. त्यामुळे या पुस्तकांचेही दर वाढले आहेत. पूर्वी ५० रुपये किमतीचे जुने पुस्तक १० ते १५ रुपयात मिळायचे, आता ते २५ रुपयात मिळत आहेत.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र