शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्टातील प्रकरणे स्थानांतरणासाठी नियम

By admin | Updated: December 12, 2015 06:03 IST

मुंबई उच्च न्यायालय आणि या न्यायालयाच्या नागपूर व औरंगाबाद खंडपीठ येथे अनेकदा समान विषयावरील प्रकरणे

नागपूर : मुंबई उच्च न्यायालय आणि या न्यायालयाच्या नागपूर व औरंगाबाद खंडपीठ येथे अनेकदा समान विषयावरील प्रकरणे दाखल होतात. अशावेळी नागपूर व औरंगाबाद खंडपीठातील प्रकरणे मुख्य न्यायमूर्तींच्या आदेशाने मुंबईत स्थानांतरित केली जातात. यामुळे नागपूर व औरंगाबाद खंडपीठाच्या क्षेत्रातील पक्षकारांचा खर्च वाढतो. त्यांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. तसेच, प्रकरण स्थानांतरणाची कृती सरसकट केली जाऊ नये. त्यामागे पक्के कारण असावे, या बाबी लक्षात घेता मुख्य न्यायमूर्तींनी यासंदर्भात नियम तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकरण स्थानांतरित करण्यापूर्वी पक्षकारांना नोटीस व सुनावणीची संधी देण्याची तरतूद नियमात करण्यात येणार आहे. राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती दिली.नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अरुण चौधरी यांनी माओवादी डॉ. गोकराकोंडा नागा साईबाबाच्या जामीन प्रकरणात याविषयी प्रश्न उपस्थित केला होता. यानंतर नागपूर खंडपीठातील सात वकिलांनी अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांच्यामार्फत या प्रकरणात मध्यस्थी अर्ज करून याचिका स्थानांतरणासाठी निश्चित नियम असणे आवश्यक असल्याचा मुद्दा मांडला. राज्य शासनाने बंदी घातलेल्या सीपीआय-माओवादी संघटनेचा सदस्य असल्याच्या कारणावरून गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी पोलिसांनी साईबाबाला ९ मे २०१४ रोजी अटक केली होती. साईबाबा ९० टक्के अपंग असून तो व्हीलचेअरशिवाय फिरू शकत नाही. अशा अवस्थेत त्याला कारागृहात ठेवण्यात आल्यामुळे मे-२०१५ मध्ये पवन डहाट यांनी एका वर्तमानपत्रात लेख लिहिला होता. त्यावरून अमरावती येथील सामाजिक कार्यकर्त्या पोर्णिमा उपाध्याय यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या तत्कालीन मुख्य न्यायमूर्तींना पत्र लिहिले होते. या पत्राची जनहित याचिका म्हणून दखल घेण्यात आली होती. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने साईबाबाला ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत तात्पुरता जामीन मंजूर केला. तसेच, जामीन कायम करण्यासाठी नियमित न्यायालयात अर्ज करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, साईबाबाने गेल्या आॅक्टोबरमध्ये नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला. (प्रतिनिधी)साईबाबाच्या अर्जावर निर्णय राखून४न्यायमूर्ती अरुण चौधरी यांनी शुक्रवारी साईबाबाच्या जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला. साईबाबा हा दिल्ली विद्यापीठाच्या रामलाल आनंद महाविद्यालयात इंग्रजीचा प्राध्यापक आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी हेम मिश्राला अटक झाल्यानंतर साईबाबाला अटक करण्यात आली होती. मिश्रा हा साईबाबा व छत्तीसगडमधील माओवादी यांच्यात माहितीची आदान-प्रदान करीत होता असे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. साईबाबातर्फे वरिष्ठ वकील रेबेका जॉन (सर्वोच्च न्यायालय) व अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग तर, शासनातर्फे मुख्य सरकारी वकील भारती डांगरे व अतिरिक्त सरकारी वकील संजय डोईफोडे यांनी कामकाज पाहिले.