शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जागेच्या वादात अडकले टर्मिनल मार्केट

By admin | Updated: September 2, 2015 04:35 IST

शेतमाल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहचविण्यासाठी नागपूर तालु्क्यातील वारंगा येथे उभारण्यात येणारे विदर्भातील पहिले

कमलेश वानखेडे ल्ल नागपूरशेतमाल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहचविण्यासाठी नागपूर तालु्क्यातील वारंगा येथे उभारण्यात येणारे विदर्भातील पहिले टर्मिनल मार्केट जागेच्या वादात अडकले आहे. विदर्भातील हजारो शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळवून देण्याची क्षमता असलेला हा प्रकल्प न्यायालयीन प्रक्रियेत अडकला आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य सरकारने या प्रकल्पात लक्ष घालावे व वेळ न घालवता पर्यायी जागेचा शोध घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.केंद्र सरकारतर्फे राज्यात मुंबई, नाशिक व नागपूर (वारंगा) अशा तीन ठिकाणी टर्मिनल मार्केट उभारण्याची घोषणा २०१० मध्ये करण्यात आली. सार्वजनिक खासगी सहभागावर (पीपीपी) हा प्रकल्प उभारण्यात येणार होता. वारंंगा टर्मिनल मार्केटसाठी नाफेडतर्फे ७० कोटी रुपये मंजूर करण्यात आले. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाची नोडल एजंसी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. राज्य सरकारने संबंधित प्रकल्पासाठी महसूल विभागाची वारंगा येथील ९० एकर जमीन राज्य कृषी पणन मंडळाला हस्तांतरित केली. मंडळाने संबंधित प्रकल्पासाठी महापालिका, नासुप्र, अग्निशमन विभाग, पर्यावरण विभाग आदी विभागांकडून लागणारे ना हरकत प्रमाणपत्रही मिळविले.काय आहे टर्मिनल मार्केट ?४टर्मिनल मार्केटमध्ये सर्व सुविधायुक्त मार्केट विकसित केले जाते. येथे भाजीपाला, फळे यासह शेतमालाची खरेदी व विक्री केली जाते. कोल्ड स्टोरेज, मोठमोठे गोदाम उपलब्ध असतात. कृषीलाचे ग्रेडेशन करून दर्जेदार मालाची विभागणी केली जाते. मालाचे उत्तम पॅकेजिंग करण्याची व्यवस्था असते. मालाची गुणवत्ता कायम राखण्याची काळजी घेतली जाते. शेतकरी येथे आपला शेतमाल थेट आणू शकतात. दलाल किंवा मध्यस्थाची गरज नसते. शेतकऱ्यांकडून घेतलेला माल देशाच्या विविध भागात ट्रकने तसेच विदेशात कार्गो विमानांनी पाठविला जातो. टर्मिनल मार्केटमुळे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव व ग्राहकांना दर्जेदार माल उपलब्ध होतो.