शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दहावीची परीक्षा ! आता वर्गातच उघडली जाणार प्रश्नपत्रिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 11:05 IST

आता प्रश्नपत्रिका केंद्र संचालकाच्या कक्षात नाही तर थेट परीक्षा खोलीमध्ये अर्थात वर्गामध्ये विद्यार्थ्यांसमोर पर्यवेक्षकाकडून उघडल्या जाणार आहेत.

ठळक मुद्देदररोज बदलणार सहायक परिरक्षक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दहावीची बोर्ड परीक्षा गुरुवारपासून सुरू होत आहे. यापूर्वी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आधी केंद्र संचालक आपल्या कक्षात उघडून संबंधित पर्यवेक्षकाच्या त्यांच्या परीक्षा खोलीतील विद्यार्थी संख्या पाहता प्रश्नपत्रिका वाटप करीत होते. परंतु आता प्रश्नपत्रिका केंद्र संचालकाच्या कक्षात नाही तर थेट परीक्षा खोलीमध्ये अर्थात वर्गामध्ये विद्यार्थ्यांसमोर पर्यवेक्षकाकडून उघडल्या जाणार आहेत.यापूर्वी केंद्र संचालकाच्या कक्षात पेपर सुरू होण्यापूर्वी अर्धा तास अथवा २० मिनिटांपूर्वी प्रश्नपत्रिकांचे बंद पाकीट फोडून त्यातील प्रश्नपत्रिका वर्गनिहाय वाटप केले जात होते. त्यामुळे पेपर बाहेर जाण्याची शक्यता जास्त होती. पेपर सुरू झाल्यानंतर केवळ अर्ध्या तासात संपूर्ण पेपरचे उत्तर कॉपीच्या माध्यमातून विद्यार्थ्यापर्यंत पोहचविले जात असल्याचे धक्कादायक प्रकार पुढे आले. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांसमोर उघडण्याचा निर्णय घेतला आहे. २४ फेब्रुवारीला झालेल्या मुख्याध्यापकांच्या बैठकीमध्ये बोर्डाने याबाबत सूचना केल्या आहेत.दहावीच्या परीक्षेत एका वर्गखोलीत २५ विद्यार्थी बसविण्याची संख्या निश्चित केली आहे. त्यानुसार २५ प्रश्नपत्रिका असलेले एक पाकीट पर्यवेक्षकाकडे सोपविले जाणार आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी सोडविलेले पेपर त्या केंद्रावरील केंद्र संचालक किंवा अतिरिक्त केंद्र संचालक कस्टडीत सोपविले जात होते. परंतु आता सहायक केंद्र संचालकाऐवजी सहायक परिरक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. हे परिरक्षक सर्व पेपर कस्टडीयनपर्यंत सोडतील, अशी व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक पेपरला परिरक्षक बदलणार आहेत.परीक्षा केंद्रावर मोबाईल वापरण्यास बंदी आहे. विद्यार्थी किंवा पर्यवेक्षकाकडे मोबाईल आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. नांद येथील जि. प. हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावर एकूण ३४२ विद्यार्थी परीक्षा देणार असून केंद्रावर सर्व सुविधा उपलब्ध केल्या आहेत. परीक्षेदरम्यान पोलीस बंदोबस्त असणार आहे.- प्रकाश धोटे, केंद्र संचालक,जिल्हा परिषद हायस्कूल, नांद

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रexamपरीक्षा