शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

रेतीच्या वादातून रोहण्यात तणाव

By admin | Updated: September 27, 2015 03:01 IST

सावनेर तालुक्यातील रोहणा परिसरातून रोज रात्री रेतीची ओव्हरलोड वाहतूक केली जाते. या वाहनांचा त्रास सहन करावा लागत असल्याने ...

रात्री बोलावली आकस्मिक आमसभा : ओव्हरलोड वाहतुकीमुळे नागरिक त्रस्तखापरखेडा : सावनेर तालुक्यातील रोहणा परिसरातून रोज रात्री रेतीची ओव्हरलोड वाहतूक केली जाते. या वाहनांचा त्रास सहन करावा लागत असल्याने स्थानिक नागरिकांनी रेतीमाफियांकडे विचारणा केली. यातून वाद उद्भवल्याने येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यातच यावर निर्णय घेण्यासाठी रात्री उशिरा आकस्मिक आमसभाही बोलावण्यात आली. हा प्रकार शुक्रवारी रात्री घडला.रोहणा शिवारातून वाहणाऱ्या कन्हान नदीच्या पारडी रेतीघाटातून रेतीची मोठ्या प्रमाणात उचल केली जाते. ही रेती रोहणामार्गे इतरत्र पाठविली जाते. रेतीचे ओव्हरलोड ट्रक रात्रभर धावतात. नागपूर महानगरपालिकेने रोहणा परिसरात कन्हान नदीवर पुलाचे बांधकाम केले असून, या पुलावरून नागपूर शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन टाकण्यात आली आहे. हा पूल वापरण्यास हलक्या चारचाकी व दुचाकी वाहनांना परवानगी देण्यात आली असून, ओव्हरलोड व जड वाहनांना या पुलावरून वाहतूक करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. हल्ली या पुलावरून ४० टन वजनाच्या रेतीच्या ट्रकची अव्याहतपणे वाहतूक सुरू आहे. वास्तवात या पुलाची क्षमता एवढ्या वजनाची नाही. असे असले तरी रेतीमाफिया या पुलावरून राजरोसपणे रेतीचे ओव्हरलोड ट्रक घेऊन जातात. दरम्यान, प्रकाश खापरे रा. रोहणा यांनी शुक्रवारी सकाळी एका ट्रकचालकास या पुलावरून ट्रक नेऊ देण्यास मनाई केली. त्यांनी सदर रेतीचा ओव्हरलोड ट्रक अडविल्याने ट्रकचालक व खापरे यांच्या वाद उद्भवला. त्यामुळे रेती व्यावसायिक लतीफ अन्सारी हा माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचला. त्याचवेळी माहिती मिळाल्याने ग्रामस्थही मोठ्या संख्येने तिथे पोहोचले. ग्रामस्थ व लतीफ अन्सारी यांच्यात शाब्दिक चकमकही उडाली. ग्रामस्थांनी प्रकाश खापरे यांची बाजू उचलून धरली होती. यावर तोडगा काढण्यासाठी सदर प्रकाराची माहिती महसूल विभागातील अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यातच शुक्रवारी रात्री स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने आकस्मिक आमसभा बोलावली. या आमसभेला महसूल विभागातील मंडळ अधिकारी प्रकाश हारगुडे, तलाठी रामटेके, पोलीस विभागातील बाबूलाल राठोड, पोलीसपाटील अरुण गोरले प्रामुख्याने उपस्थित होते. यात ग्रामस्थांनी रेतीमाफियांच्या जाचाचा पाढाच वाचला. रेतीमाफियांच्या अरेरावीला पोलिसांनीही दुजोरा दिला. दरम्यान, पोलिसांनी रेतीमाफियांशी हातमिळवणी केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या आमसभेत काही महत्त्वाचे ठराव पारित करण्यात आले. (प्रतिनिधी)