शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तंबाखूमुळे होतात पती-पत्नीत भांडण

By admin | Updated: June 1, 2016 02:54 IST

कौटुंबिक न्यायालयात येणाऱ्या ७० ते ८० टक्के प्रकरणांमध्ये पती-पत्नीमधील भांडणाचे कारण तंबाखू ,

नागपूर : कौटुंबिक न्यायालयात येणाऱ्या ७० ते ८० टक्के प्रकरणांमध्ये पती-पत्नीमधील भांडणाचे कारण तंबाखू , गुटखा, मद्य आणि इतर मादक पदार्थ असल्याचे दिसून येत असल्याचे कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश ई. म. बोहरी यांनी सांगितले. कौटुंबिक न्यायालयात कौटुंबिक न्यायालय आणि कौटुंबिक न्यायालय वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने तंबाखूविरोधी दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रास्ताविक भाषण करताना ते बोलत होते.व्यासपीठावर बालरोग तज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर, कर्करोग तज्ज्ञ डॉ. सुशील मानधनिया, कौटुंबिक न्यायालय वकील संघाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. मुजीबुद्दीन आणि अ‍ॅड. श्याम अंभारे उपस्थित होते. बोहरी पुढे म्हणाले की, प्रत्येक पत्नीला आपल्या पतीला ‘खाल जर्दा तर होईल मुर्दा’, असे सांगण्याची वेळ आली आहे. व्यसन कुठलेही असो ते वाईटच आहे. त्याच्या दुष्परिणामाबाबत वारंवार सांगूनही मनावर ताबा नसेल तर ती व्यक्ती त्यात गुरफटली जाते आणि पुढे जाऊन अशी व्यक्ती व्यसनाधीन होते. तंबाखू हे कुटुंब, समाज आणि देश या सर्वांच्या हितासाठी घातकच ठरते. सुप्रसिद्ध कर्करोगतज्ज्ञ डॉ. सुशील मानधनिया यांनी सांगितले की, तंबाखूमध्ये असणारा निकोटिन नावाचा पदार्थ हा कर्करोगाला आमंत्रित करणारा असल्याने, त्यापासून दूर राहण्याचे त्यांनी आवाहन केले. निकोटिन हा स्लो पॉयझन आहे. तंबाखूमध्ये पाच हजार रसायने असतात. त्यापैकी २७० रसायने घातक आणि ६९ रसायने कर्करोगाची शक्यता वाढविणारे आहेत. तंबाखू व इतर मादक पदार्थांचे सेवन करणाऱ्यांमध्ये कर्करोगाचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळून येते, असेही त्यांनी सांगितले. आपल्या स्वत:च्या कुटुंबातील व्यक्तींना कर्करोग झाल्यामुळे त्यांच्या वेदना आपण जवळून पाहिल्या आहेत. त्यामुळे तंबाखू व इतर मादक पदार्थांपासून दूर राहण्याची कळकळीची विनंती त्यांनी केली.धूम्रपानाचा स्त्रियांनाही फटका नागपूर : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर म्हणाले की, ज्या स्त्रिया तंबाखूचे सेवन करतात किंवा धूम्रपान करतात त्याचा गर्भावर परिणाम होतो. स्त्री गर्भवती असताना तंबाखू किंवा तत्सम पदार्थांचे सेवन केल्याने बाळाला निमोनिया, अस्थमा व इतर रोग होण्याची शक्यता बळावते. कधी कधी मृत्यूसुद्धा होऊ शकतो. तंबाखू किंवा इतर मादक पदार्थांचे सेवन करताना सुरुवातीला चांगले वाटत असले तरी त्याचे दुष्परिणाम नंतर भोगावे लागतात. (प्रतिनिधी)