शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ताण घेतोय प्राण !

By admin | Updated: July 20, 2015 03:07 IST

आज तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले असले तरी कुटुंबातील जवळचे लोक मात्र एकमेकांपासून दूर होत आहे.

योगेश पांडे नागपूरआज तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले असले तरी कुटुंबातील जवळचे लोक मात्र एकमेकांपासून दूर होत आहे. उपलब्ध सुखसुविधांमध्ये वाढ होत असतानादेखील दैनंदिन जीवन मात्र ताणतणावाचे झाले आहे. यातूनच निर्माण होणाऱ्या कौटुंबिक कलहातून चक्क जीव देण्यापर्यंत लोकांची मजल जात आहे. २०१४ या वर्षात कौटुंबिक ताणामुळे नागपुरात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. ‘एनसीआरबी’ने (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो) जाहीर केलेल्या आकडेवारीत ही बाब समोर आली आहे. आत्महत्यांत नागपूर राज्यात तिसरे२०१४ या वर्षात नागपुरात ५१३ जणांनी आत्महत्या केल्या. यात ४०० पुरुष व ११३ महिलांचा समावेश आहे. पुरुषांच्या आत्महत्येची टक्केवारी ही सुमारे ८० टक्के इतकी आहे. मुंबई व पुण्यानंतर नागपुरातच आत्महत्येच्या सर्वात जास्त घटना घडल्या आहेत. २०१३ साली शहरात ५२३ आत्महत्या झाल्या होत्या.‘तेरे बिन’ थेट आत्महत्याचदरम्यान, प्रेमसंबंधात आलेल्या अपयशामुळे प्रेमवीरांच्या आत्महत्या करण्याचे प्रमाणदेखील वाढीस लागले आहे. २०१४ वर्षात ३१ प्रेमवीरांनी जीव दिला. यात २० तरुण व ११ तरुणांचा समावेश आहे. मागील वर्षी आत्महत्येचा आकडा २१ होता. २०१० सालापासून म्हणजेच गेल्या पाच वर्षांत ११३ जणांनी प्रेमप्रकरणांतून आत्महत्या केल्या आहेत. जात, धर्म, वय, पैसे इत्यादी कारणांमुळे प्रेमाला घरातील लोकांचा विरोध होतो व यातूनच प्रेमात पडलेली व्यक्ती सारासर विचार न करता आयुष्याला संपविते. आश्चर्याची बाब म्हणजे रोजगार नसल्यामुळे नैराश्याचे प्रमाण वाढत असले तरी प्रेमप्रकरणांतून आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. बेरोजगारीच्या समस्येतून केवळ एकच आत्महत्या झाली. बेरोजगारीतून आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण दरवर्षी खालावत आहे. २०१३ मध्ये ४, २०१४ मध्ये १० तर २०१० मध्ये १५ जणांनी या कारणातून जीव दिला होता.