शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.च्या जिल्हास्तरीय मेळाव्यात सहभागी होणार दहा हजार महिला 

By गणेश हुड | Updated: February 8, 2024 19:57 IST

आता जिल्हास्तरावर  मेळावा व महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच मैदानी स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे. 

नागपूर : जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्यावतीने नागपूर ग्रामीण तालुक्यातील गोटाळपांजरी ग्राऊंड कस्तुरी चौक येथे जिल्हास्तरीय महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात जिल्ह्यातील दहा हजारांहून अधिक महिला सहभागी होणार असल्याची माहिती  जि.प.च्या महिला बाल कल्याण सभापती प्रा. अवंतिका लेकुरवाळे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

महिलांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी महिला व बाल कल्याण विभागातर्फे  प्रत्येक तालुक्यामध्ये महिलांसाठी महिला मेळाव्यासोबतच जेंडर प्रशिक्षण देण्यात आले. आता जिल्हास्तरावर  मेळावा व महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच मैदानी स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे. 

मेळाव्याला  जि.प. अध्यक्षा मुक्ता कोकड्डे, उपाध्यक्षा कुंदा राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांच्यासह  आमदार, जि.प. पदाधिकारी, सदस्य  तसेच सोशल मिडीया स्टार नेहा ठोंबरे उपस्थित राहणार आहेत. विभागाच्यावतीने गेल्या दोन वर्षात आजवर जिल्हा-तालुकास्तरावर ३९ महिला मेळावे आयोजित करण्यात आलेत. या मेळाव्यामध्ये जिल्हाभरातुन अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका, बचत गट महिलांसह सामान्य शेतकरी महिलांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार असल्याचे लेकुरवाळे यांनी सांगितले.