शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
2
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
3
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
4
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
5
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा
6
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
7
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
8
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
9
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
10
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
11
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
12
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप
13
सिंधमध्ये पाकिस्तान सरकारला विरोध तीव्र, बेनझीर भुत्तोंच्या लेकीच्या ताफ्याला घेराव, लाठ्या काठ्यांनी हल्ला   
14
IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी कठोर मेहनत; १० किलो वजनही कमी केलं! पण... सरफराजला ते प्रकरण भोवलं?
15
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
16
फायद्याची गोष्ट! रिकाम्या औषधांच्या रॅपरचा मोठा उपयोग; गृहिणी करतात किचनमध्ये क्रिएटिव्ह वापर
17
इंटरनेटची सुविधा नाही, फोनही लागत नाही; भुयारी मेट्रोचा प्रवास ठरतोय त्रासदायक!
18
Varlin Panwar : वडील आर्मी ऑफिसर, लेकही होती IAF स्क्वाड्रन लीडर; आता प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्सना देतेय ट्रेनिंग
19
वडिलांची झाली हत्या, मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी 'तो' झाला IPS; फी भरण्यासाठी विकलं धान्य
20
IND vs ENG : तो चांगला खेळतोय; पण...श्रेयस अय्यर कसोटी संघात का नाही? अजित आगरकर यांनी असं दिलं उत्तर

दहा हजार लोकांनी घेतली बुद्ध धम्माची दीक्षा

By admin | Updated: October 2, 2014 01:06 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ५८ वर्षांपूर्वी ज्या ठिकाणी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली त्या पवित्र स्थळाची माती आपल्या कपाळी लावून बुधवारी जवळपास दहा हजार लोकांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली;

दोन हजारांवर झाले श्रामणेर : भंते सुरेई ससाई यांच्या हस्ते घेतली दीक्षा नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ५८ वर्षांपूर्वी ज्या ठिकाणी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली त्या पवित्र स्थळाची माती आपल्या कपाळी लावून बुधवारी जवळपास दहा हजार लोकांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली; त्याचबरोबर दोन हजार लोकांनी श्रामणेर दीक्षासुद्धा घेतली. भंते आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी त्यांना दीक्षा दिली. दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने दीक्षाभूमी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याला सुरुवात झाली आहे. बुधवारी सकाळी ९.३० वाजता धम्मदीक्षा सोहळ्याला सुरुवात झाली. भंते आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण करून समारंभाला प्रारंभ केला. भंते ससाई यांच्या नेतृत्वात भंते अश्वघोष, भंते नागघोष, भंते नागवंश, भंते धम्मबोधी, भंते धम्मरत्न, भंते उपाली, भंते कुमारकश्यप आणि भंते नागसेन यांनी दीक्षा प्रदान केली. याप्रसंगी स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले, सदस्य सर्वश्री विजय चिकाटे, सुधीर फुलझेले, एन.आर. सुटे, विलास गजघाटे यांच्यासह डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश खरात, रजिस्ट्रार जोसेफ प्रामुख्याने उपस्थित होते. रात्रीपर्यंत दीक्षा सोहळा सुरु होता.उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील नागरिकांनी आपापल्या ग्रुपने येऊन बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. प्रत्येकांना त्रिशरण पंचशील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा देऊन दीक्षा देण्यात आली. तसेच प्रत्येक दीक्षार्थ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि धम्मसेना यांच्या संयुक्त विद्यमाने एक प्रमाणपत्रसुद्धा प्रदान करण्यात आले, तसेच दोन हजारावर लोकांनी श्रामणेर दीक्षासुद्धा घेतली. त्यांनासुद्धा प्रमाणपत्र देण्यात आले. हा दीक्षाविधी सोहळा धम्मचक्र प्रवर्तनदिन सोहळ्यापर्यंत राहील. कार्यक्रमासाठी कैलाश वारके, अरुण कावळे, मनोज राऊत, गौतम अंबादे, शरद मेश्राम, रवी मेंढे, देवाजी रंगारी, प्रदीप डोंगरे परिश्रम घेत आहेत. (प्रतिनिधी)आज जागतिक धम्म परिषद धम्मचक्र प्रवर्तनदिन सोहळ्यानिमित्त दीक्षाभूमीवर सुरू असलेल्या सोहळ्यांतर्गत उद्या, गुरुवार २ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता जागतिक धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे. भंते आर्य नागार्जुन सुरेई ससाई हे अध्यक्षस्थानी राहतील. स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात येईल. या परिषदेला थायलंड, जपान, कम्बोडिया, श्रीलंका, लाओस या देशातील भिक्खू व बौद्ध नेते मार्गदर्शन करतील. एस.के. गजभिये हे मराठी आणि हिंदीमध्ये अनुवाद करतील. तत्पूर्वी सकाळी ९ वाजता दीक्षाभूमीवरील मुख्य सोहळ्याच्या ठिकाणी स्मारक समितीचे सदस्य ज.म. मूल यांच्या हस्ते पंचशील झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात येईल. समितीचे सदस्य विजय चिकाटे अध्यक्षस्थानी राहतील तर एन.आर. सुटे हे प्रमुख अतिथी राहतील. थायलंडमधील बौद्ध विचारवंतांची विशेष उपस्थिती यंदाच्या धम्मदीक्षा सोहळ्याला थायलंड येथील मेजर जनरल थानसक पोमपेच्च आणि डॉ. रंगथिप चोटनापलाई हे मुख्य अतिथी राहणार आहेत. परंतु त्यांच्यासोबत तब्बल ३८ बौद्ध विचारवंतांचीसुद्धा विशेष उपस्थिती राहील. यात पटछाया फट्टाराचैरॉन, सियारट फोटीबुसायावट, चुटीमा अनंथराप्रयून, राविवान थिरावल, नफाटसोर्न फाटसोर्नपियासक, पीमलाडा पट्टनावोंगकित्ती, फ्रामाहा विनीत फारचरून, फेरा साकोर्न वाट्टाना, रविवान खंजानाविसीट्टाफोल, वान्ना वाटचरसक्त्रकूल, सुकिटा सुकपुन्टावी, चनाटदा लोईखाओफोंग, नीड लाओपोंगसोर्न, नारीत बैंगम, नारीलूक सुत्तीरुत, जरुनान मोंगक्लाकोर्न, रविवान ओराओन, जंतना डुंगमानी, डुट्साडीफट रोतखाजोर्नवानीत, मानाफाथ्थाना रोतखाजोर्नवानीत, सुत्तीमोन चैहोउदजारोईन, अरुणी ओ-चारोईन आदींचा समावेश आहे.