शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सात हॉटेल्सना तात्पुरती परवानगी

By admin | Updated: December 29, 2016 02:33 IST

राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर मद्य विक्रीसाठी परवाना देऊ नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

उत्पादन शुल्क विभाग : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन नागपूर : राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर मद्य विक्रीसाठी परवाना देऊ नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्या अनुषंगाने यावर्षी राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील क्लब वा हॉटेल्सना ३१ डिसेंबरच्या कार्यक्रमासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने परवाना देण्यास नकार दिला आहे. याशिवाय महामार्गापासून ५०० मीटर अंतरावरील हॉटेल्सना परवाना नाकारला आहे. एफएल-४ अंतर्गत दारू विक्रीचा तात्पुरता परवाना मिळावा म्हणून नागपूर विभागाकडे अनेक अर्ज आले आहेत, पण त्यांना परवाना नाकारण्यात येत आहे. २८ डिसेंबरपर्यंत २० अर्जाची छाननी करून सात हॉटेल्स व क्लबना परवाना दिल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नागपूर विभागाचे उपअधीक्षक मिलिंद पटवर्धन यांनी लोकमतला दिली. पुढे अर्ज आल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून एक वा काही दिवसांचा परवाना देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. पटवर्धन यांनी सांगितले की, एलएल-३ अंतर्गत क्लब वा हॉटेलला कायमचा परवाना दिला जातो. पण तात्पुरताा परवान्यासाठी एफएल-४ अंतर्गत दरदिवसाचे १० हजार रुपये शुल्क आकारण्यात येते. पुन्हा काही दिवस परवाना हवा असल्यास दिवसाप्रमाणे शुल्क आकारण्यात येते. आतापर्यंत आलेल्या अर्जाची छाननी करून सात जणांना परवाना दिला आहे. अमरावती रोडवरील महाराजबाग क्लब आणि वर्धा रोडवरील रॅडिसन हॉटेल महामार्गावर येत असल्यामुळे तात्पुरता परवाना दिला नाही. अशा प्रकारे अनेक हॉटेल्सना परवाना नाकारण्यात आला आहे. गतवर्षी २५ ते ३१ डिसेंबरपर्यंत आलेल्या अर्जाची छाननी करून ३७ हॉटेल्स आणि क्लबला काही दिवसांसाठी तात्पुरती परवानगी दिली होती. यावर्षी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे तात्पुरत्या परवान्याकरिता अर्ज कमी आल्याचे पटवर्धन यांनी सांगितले. पुढे आलेल्या अर्जावर न्यायालयाच्या आदेशानुसार विचार करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)