शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या शिंगाडा मार्केटमधील मंदिर तुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 23:06 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी नवीन शुक्रवारीतील शिंगाडा मार्केट परिसरामधील उद्यानात असलेल्या मंदिराला संरक्षण देण्यास नकार दिला. तसेच, नागराज महाराज व माँ अंबे चॅरिटेबल ट्रस्टचा यासंदर्भातील अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे संबंधित मंदिर तुटणार हे निश्चित झाले.

ठळक मुद्देहायकोर्टाचा निर्णय : ट्रस्टचा अर्ज फेटाळला

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी नवीन शुक्रवारीतील शिंगाडा मार्केट परिसरामधील उद्यानात असलेल्या मंदिराला संरक्षण देण्यास नकार दिला. तसेच, नागराज महाराज व माँ अंबे चॅरिटेबल ट्रस्टचा यासंदर्भातील अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे संबंधित मंदिर तुटणार हे निश्चित झाले.न्यायालयाने गेल्या तारखेला अर्जावरील सुनावणी तहकूब करून ट्रस्टच्या अध्यक्षा प्रमिलाबाई सावरकर यांना समन्स बजावला होता. त्यानुसार सावरकर यांनी न्यायालयात हजेरी लावली. दरम्यान, त्यांनी मंदिर पाडण्यात येऊ नये अशी विनंती केली. परंतु, त्यांना मंदिराच्या बांधकामाची वैधता सिद्ध करता आली नाही. मंदिर उभे असलेली जागा सरकारची असून मंदिराचे बांधकाम करताना कुणाचीही परवानगी घेण्यात आली नाही. परिणामी, न्यायालयाने सावरकर यांना दिलासा देण्यास नकार दिला.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. यासंदर्भात न्यायालयात मनोहर खोरगडे व डॉ. गजानन झाडे यांची जनहित याचिका प्रलंबित आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. फिरदोस मिर्झा, महापालिकेतर्फे वरिष्ठ वकील सी. एस. कप्तान व अ‍ॅड. सुधीर पुराणिक तर, ट्रस्टतर्फे अ‍ॅड. जितेंद्र मटाले यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयReligious Placesधार्मिक स्थळे