शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टिका, स्पष्टच बोलले
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
5
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
6
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
7
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
8
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
9
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
10
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
11
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
12
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
13
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
14
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
15
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
16
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
17
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
18
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
19
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
20
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...

सांगा, किती लोकांना चावले कुत्रे !

By admin | Updated: January 15, 2015 01:00 IST

राज्यामध्ये गेल्या वर्षभरात किती लोकांना मोकाट कुत्रे चावले याची आकडेवारी सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी शासनाला दिलेत. तसेच,

हायकोर्ट : आकडेवारी देण्याचे शासनाला निर्देशनागपूर : राज्यामध्ये गेल्या वर्षभरात किती लोकांना मोकाट कुत्रे चावले याची आकडेवारी सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी शासनाला दिलेत. तसेच, मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत, यावर महानगरपालिकेला माहिती देण्यास सांगितले.शहरात मोकाट कुत्रे हैदोस घालत असल्यामुळे अनिरुद्ध गुप्ते व इतरांनी जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मृदुला भटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. महानगरपालिका कारवाई करीत नसल्यामुळे मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. रस्त्याने जाणाऱ्या वाहनांवर कुत्र्यांच्या टोळ्या झडप घालतात. मोटरसायकल असल्यास चालक एकतर करकचून ब्रेक दाबतो किंवा कुत्रे चावण्याच्या भीतीमुळे गाडीसह रोडवर कोसळतो. अशावेळी मागून येणारी वाहनेही एकमेकांवर आदळतात. मोकाट कुत्र्यांची रात्री सर्वाधिक भीती असते. शासकीय इमारती व रुग्णालयांमध्ये मोकाट कुत्र्यांचा मुक्त संचार असतो. मेडिकलमध्ये नवजात बाळांना कुत्र्यांनी कुरतडून खाल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. यासंदर्भात महानगरपालिकेने गंभीरतेने उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)