शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातून केले अमेरिकेत वास्तुपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 10:13 IST

अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या एका भारतीय दाम्पत्याने वास्तूचे पूजन भारतीय संस्कृतीनुसार केले. या पूजनाचे वैशिष्ट्य म्हणजे पुरोहित हे भारतात होते आणि विधी अमेरिकेत पार पडले.

ठळक मुद्देतंत्रज्ञानाद्वारे संस्कृतीचे जतनचार तास पूजनआॅनलाईन घेतले आशीर्वाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय लोक कुठेही गेले तरी आपल्या संस्कृतीला विसरत नाही. याची प्रचिती अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या एका भारतीय दाम्पत्याने आणून दिली. त्यांनी अमेरिकेत घेतलेल्या वास्तूचे पूजन भारतीय संस्कृतीनुसार केले. या पूजनाचे वैशिष्ट्य म्हणजे पुरोहित हे भारतात होते आणि विधी अमेरिकेत पार पडले. अगदी भारतीय पद्धतीने पार पडलेले हे वास्तुपूजन साध्य झाले केवळ तंत्रज्ञानामुळे.नरेंद्रनगर येथील रहिवासी नंदकिशोर भालेकर यांचा मुलगा श्रीधर व सून सोनम भालेकर हे अमेरिकेत वास्तव्यास आहेत. हे दोघेही अ‍ॅपल मोबाईल कपंनीत स्वॉफ्टवेअर इंजिनीअर आहेत. त्यांनी अमेरिकेतील ‘सेन होजे’ येथे घर घेतले. घराचे वास्तुपूजन हे भारतीय संस्कृतीनुसार करण्याचे त्यांनी ठरविले. त्यांनी पंचांगानुसार तिथी काढली व वास्तुपूजनाचा कार्यक्रम निश्चित केला. स्थानिक बाजारपेठेतून वास्तुपूजनासाठी लागणारे साहित्य आणले.परंतु पूजा कोण करेल, हा प्रश्न त्यांना भेडसावत होता. त्यामुळे त्यांनी आॅनलाईन पूजा करण्याचा निर्णय घेतला. भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता पं. अनंत जोशी यांनी वास्तुपूजनाला सुरुवात केली व रात्री १२ वाजता पूजा संपविली.पौरोहित्य करणारे जोशी हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पूजाविधी सांगत मंत्रोच्चार करीत होते.पं. अनंत जोशी यांनी नंदकिशोर भालेकर यांच्या नरेंद्रनगर येथील घरातून पूजाविधी सांगितली. पूजन संपल्यानंतर पती-पत्नी दोघांनीही पुरोहितांचे आॅनलाईन आशीर्वाद घेतले.

टॅग्स :cultureसांस्कृतिक