शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

वायुप्रदूषणावर तंत्रज्ञानातून नियंत्रण शक्य

By admin | Updated: August 7, 2014 01:01 IST

आजच्या काळात वायुप्रदूषण सर्वात मोठ्या अन् गंभीर समस्येचे रूप घेत आहे. जगभरातील देशांमधून यासंदर्भात चिंता व्यक्त करण्यात येत आहे अन् त्यावर तंत्रज्ञानातूनच नियंत्रण आणणे शक्य आहे

पी. के. सेठ : ‘नीरी’त तज्ज्ञांनी टाकला निरनिराळ्या मुद्यांवर प्रकाशनागपूर : आजच्या काळात वायुप्रदूषण सर्वात मोठ्या अन् गंभीर समस्येचे रूप घेत आहे. जगभरातील देशांमधून यासंदर्भात चिंता व्यक्त करण्यात येत आहे अन् त्यावर तंत्रज्ञानातूनच नियंत्रण आणणे शक्य आहे असे मत लखनौ येथील ‘बायोटेक पार्क’चे सीईओ प्रा.पी.के.सेठ यांनी व्यक्त केले. ‘नीरी’तर्फे (नॅशनल एन्व्हायर्नमेन्टल इंजिनिअरींग रिसर्च इन्स्टिट्यूट) आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.‘एअर पॉल्युशन इंड्युस्ड हेल्थ इफेक्ट्स, हेल्थ रिस्क असेसमेन्ट सॉफ्टवेअर डेव्हलपमेन्ट अ‍ॅन्ड डेमॉस्ट्रेशन’ या विषयावर आयोजित कार्यशाळेला सेठ यांच्यासोबतच सेसा स्टरलाईट अ‍ॅन्ड वेदांत प्रा.लि.चे महाव्यवस्थापक डॉ.कुमारा वेदान, व्हीएनआयटीचे प्राध्यापक डॉ.टी.चक्रबर्ती, ‘आयसीएमआर’चे (इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च) उप महासंचालक डॉ.आर.एस.धारीवाल, ‘नीरी’चे संचालक डॉ.सतीश वटे व आयोजन सचिव डॉ.के.कृष्णमूर्ती हे प्रामुख्याने उपस्थित होते. चार भिंतींच्या आतमध्ये असलेल्या वायुप्रदूषणामुळे १६ लाख लोकांना श्वसनाचे आजार झाले आहेत. याशिवाय कोट्यवधी लोकांना वायुप्रदूषणामुळे इतरही आजार झाले आहेत. जर वायुप्रदूषणावर नियंत्रण आणले तर सुमारे सव्वा कोटी लोकांना प्राणांतिक आजारांपासून वाचविता येईल. यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात सखोल संशोधनावर भर देण्याची गरज असल्याचे प्रा.सेठ यांनी बोलून दाखविले. कार्यशाळेदरम्यान डॉ.चक्रबर्ती यांनी वातावरणातील मँगनीजचे प्रमाण आणि त्याचा मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामांवर प्रकाश टाकला. वाढते तापमान आणि वातावरणातील प्रदूषणाची पातळी यामुळे श्वसनाशी संबंधित रोग वाढीस लागले आहे असे डॉ.चक्रबर्ती म्हणाले. यावेळी डॉ.धारीवाल, डॉ.वेदान यांनीदेखील वायुप्रदूषण, तंत्रज्ञान आणि उद्योग यांच्या परस्परसंबंधांवर प्रकाश टाकला. कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी तीन वैज्ञानिक सत्रांचे आयोजन करण्यात आले. यात ‘एअर क्वॉलिटी मॉनिटरींग अ‍ॅन्ड मॉडेलिंग’, ‘आॅक्युपेशनल हेल्थ रिस्क असेसमेन्ट’ इत्यादी मुद्यांवर तज्ज्ञांनी भाष्य केले.याअगोदर ‘नीरी’चे संचालक डॉ.सतीश वटे यांनी प्रदूषणाच्या अभ्यासासाठी निर्माण करण्यात आलेल्या ‘सॉफ्टवेअर’संदर्भात उपस्थितांना माहिती दिली. ‘नीरी’ची स्थापनाच वातावरणाच्या अभ्यासासाठी झाली होती व त्याच मार्गावर संस्थेचे काम सुरू आहे असे ते म्हणाले. कार्यशाळेचे आयोजन सचिव डॉ.के.कृष्णमूर्ती यांनी या कार्यशाळेची प्रस्तावना मांडली. डॉ.पी.के.नवघरे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)