शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
3
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
4
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
5
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
6
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
7
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
9
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
10
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
11
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
12
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
13
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
14
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
15
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
16
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
17
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
20
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार

‘कॅशलेस’च्या साक्षरतेसाठी धडपडणारा ‘टेक्नोक्रॅट’

By admin | Updated: February 9, 2017 02:39 IST

मोबाईल क्रांतीकडे वाटचाल करणाऱ्या भारतात डिजिटलची ओढ लागली होती. मात्र पंतप्रधानाच्या नोटाबंदीच्या

 अजित पारसेंनी चालविले अभियान : वस्त्यांमध्ये फिरून देतोय प्रशिक्षण निशांत वानखेडे   नागपूर मोबाईल क्रांतीकडे वाटचाल करणाऱ्या भारतात डिजिटलची ओढ लागली होती. मात्र पंतप्रधानाच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर अचानक कॅशलेस व्यवहाराचा नारा दिल्याने धावपळ उडाली आहे. नुसते आवाहन करून जाहिराती सुरू आहेत. प्रशिक्षण आणि पुरेशा माहितीअभावी नागरिकांची तारांबळ उडत आहे. ही परिस्थिती लक्षात घेत नागपूरच्या तरुण व्यावसायिकाने कॅशलेस म्हणजे ई-व्यवहाराच्या साक्षरतेचे अभियानच हाती घेतले आहे. विशेषत: गरीब वस्त्यात जाऊन हा तरुण लोकांना नि:शुल्क रोकडरहीत व्यवहाराचे प्रशिक्षण देत आहे. भविष्याचा वेध घेणाऱ्या या व्यक्तीचे नाव अजित पारसे. स्वावलंबीनगर येथे राहणारे अजित पारसे व्यवसायाने सॉफ्टवेअर डेव्हलपर्स आहेत. या व्यवसायात असल्याने तंत्रज्ञानाचे महत्त्व त्यांना माहीत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांना सामाजिक जाण आहे. त्यामुळे काही वर्षापासून गरीब वस्त्या व झोपडपट्ट््यांमध्ये ‘ई-साक्षरतेचे’ अभियान चालविले आहे. त्या अभियानाला पारसे यांनी कॅशलेस व्यवहाराच्या प्रशिक्षणाची नवी कडी जोडली आहे. देशात ८५ टक्के व्यवहार रोखीने चालत आहेत. कॅशलेसचे व्यवहार गेल्या काही वर्षात सुरू झाले असले तरी त्याचे प्रमाण अगदीच नगण्य होते. नोटाबंदीच्या निर्णयानंतर रोकडरहीत व्यवहार अंगिकारण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र याबाबत माहितीच्या अभावामुळे लोकांना अडचणच सहन करावी लागत आहे. उच्चभ्रू वर्गामध्ये हा प्रश्न नसला तरी ही मध्यमवर्ग व त्याहीपेक्षा गरीब, मोलमजुरी करणाऱ्यांना यामुळे समस्यांना सामोरे जावे लागते. लोकांची ही अडचण लक्षात घेत अजित पारसे यांनी स्वत:च प्रेरणेने कॅशलेस प्रशिक्षणाचे अभियान सुरू केले. यासाठी कुठल्या पक्षाची किंवा शासकीय योजनांचीही मदत घेतली नाही. यासाठी त्यांनी स्वत:च व्हॅन विकत घेतली व त्यात प्रशिक्षणासाठी आवश्यक तंत्रज्ञान बसवून घेतले. कॅशलेस व्यवहाराचे फायदे व वापरण्याची माहिती कष्टकरी, वंचितांना देण्यासाठी अजित पारसे प्रयत्न करीत आहेत. यासाठी ते स्वत: दररोज शहरातील कुठल्या ना कुठल्या झोपडीपटट्ी, मजूर ठिय्या, महिला बचत गट, सामाजिक संस्था, अनाथालय, दिव्यांग संस्था इत्यादी ठिकाणी जाऊन संगणक रोकडरहीत व्यवहार वापराचे नि:शुल्क मार्गदर्शन करतात. यामध्ये त्यांच्यासमवेत काही सहकारीही जुळले आहेत. गरीब महिला, मजूर दिसले की त्यांना माहिती देतात. त्यांनी भाजीविक्रेते, आॅटोचालक, पानठेलेचालक कॅशलेसबाबत जागरूक करून दुकानांवर त्याचे तंत्रज्ञान लावण्यासाठी प्रोत्साहित केले व व्यवहार बँकेशी जोडण्यास मदत केली. अनेकांना स्वत: स्वाईप मशीन आणून दिली. एखाद्या वस्तीमध्ये माहिती देताना काही हुशार तरुण दिसले की, त्यांना स्वत:च्या कार्यालयात आणून नि:शुल्क प्रशिक्षण देण्याचे कामही त्यांनी चालविले आहे. या कार्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व सामाजिक कार्यकर्ते डॉ. विरल कामदार यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील टेक्नोसॅव्ही लोकांनी व शासकीय यंत्रणांनी लोकांच्या प्रशिक्षणासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. ‘आधार’बेस व्यवहार सर्वांसाठी सोयीचे कॅशलेस व्यवहारासाठी अनेक कंपन्या बाजारात आहेत. काही वर्षांअगोदर सरकारने रुपी कार्ड सुरू केले होते. डेबिट कार्ड व क्रेडिट कार्ड आहेतच. मात्र काही नव्या कंपन्या लोकप्रिय ठरत आहेत. यामध्ये आपल्या आधार कार्डच्या मदतीने होणारे व्यवहार अधिक चांगले असल्याचे अजित पारसे यांनी सांगितले. विशेषत: गरीबस्तरातील आणि ग्रामीण भागातील लोकांसाठी अधिक सोयीस्कर ठरणारा आहे. मोठे दुकानदारच नाही तर भाजीविक्रेते, आॅटोचालक, पानविक्रेतेही कॅशलेस व्यवहाराचे विविध तंत्रज्ञान सहज वापरू शकतात. धोकादायक काहीच नाही कॅशलेस व्यवहारात उतरलेल्या बोगस कंपन्याही बाजारात आहेत. मात्र त्या फार काळ टिकू शकत नाही. त्यामुळे कॅशलेस व्यवहार धोकादायक नसून लाभदायकच ठरणारे आहे. मात्र लोकांनी पिन नंबर, पेटीएम नंबर किंवा कोणताही गोपनीय क्रमांक शेअर न करण्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.