शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

मोबाइल, संगणकामुळे आटत आहेत डोळ्यातील अश्रू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 11:17 IST

मोबाइल, संगणक, लॅपटॉपचा परिणाम डोळ्यावर होत आहे. डोळे ‘ड्राय’ होण्याचे प्रमाण वाढले आहे.

ठळक मुद्देजे लोक संगणक, लॅपटॉप किंवा मोबाईलचा खूप जास्त वापर करतात, त्यांनी दहा मिनिटांमध्ये एका मिनिटासाठी डोळे मिटावे. परंतु जोरात डोळे मिटू नये.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अलीकडे लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत अनेकजण मोबाईल, संगणक, लॅपटॉपवर खूप जास्त वेळ घालवितात. याचा परिणाम डोळ्यावर होत आहे. डोळे ‘ड्राय’ होण्याचे प्रमाण वाढले आहे. आपण साधारण दर मिनिटाला ३० वेळा पापण्या लवतो. परंतु जेव्हा आपण या ‘गॅजेट’वर एखादा व्हिडिओ, चित्रपट किंवा चित्रे पाहतो तेव्हा पापण्या लवण्याचे प्रमाण १०-१२ वेळापर्यंतच होते. परिणामी, डोळ्यात अश्रू तयार करणाऱ्या कार्यावर याचा प्रभाव पडतो. डोळ्यातील अश्रू हवेतील वातावरणामुळे आटतात. परिणामी, कृत्रिम अश्रूची म्हणजे ‘आय ड्रॉप’ची गरज पडते. काहींना आयुष्यभर या ड्रॉपची गरज पडू शकते, अशी माहिती आॅल इंडिया आॅप्थलमोलॉजी सोसायटीचे माजी अध्यक्ष डॉ. कुरेश मस्कटी यांनी दिली.आॅप्थलमोलॉजिकल सोसायटी नागपूरचा (ओएसएन) पदग्रहण सोहळा रविवारी थाटात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मस्कटी तर विशेष अतिथी म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. वाय. एस. देशपांडे उपस्थित होते. मधुमेहाचे ५० टक्के रुग्ण दृष्टी अधू झाल्यावरच येतातभारतात मधुमेहाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. परंतु अजूनही हवी त्या प्रमाणात जनजागृती नसल्याने मधुमेहाचे ५० टक्के रुग्ण दृष्टी अधू झाल्यावर किंवा अंधत्व आल्यावरच डॉक्टरांकडे येतात. विशेषत: मधुमेहामुळे अंधत्व आलेल्या रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया केल्यानंतरही डोळ्यात पुन्हा रक्तस्राव होण्याची शक्यता असते. कारण, डोळ्याच्या नसा फार पातळ झालेल्या असतात. वारंवार शस्त्रक्रियाही अनेकांसाठी परडवणाऱ्या नसतात. यामुळे मधुमेहाचे निदान होताच नेत्ररोग तज्ज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक आहे. मधुमेहीने वर्षातून एकदा डोळ्यांची तपासणी करणे आवश्यक आहे, असा सल्लाही डॉ. मस्कटी यांनी दिला.

मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चष्मा टाळता येतोमोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेदरम्यान कृत्रिम नेत्रभिंग (इंट्रॉक्युलर लेन्स) टाकले जाते. आता यात अद्यावत ‘लेन्स’ही उपलब्ध होऊ लागले आहेत. यामुळे पूर्वी ज्यांना जवळचे किंवा दूरचे दृष्टिदोष असायचे त्यांना मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर चष्मे वापरावे लागायचे. परंतु आता असे काही लेन्स उपलब्ध झाले आहेत ज्यामुळे चष्म्याची गरजच पडत नाही. ‘रेटीना’च्या रुग्णांसाठी अनेक नवे इंजेक्शन उपलब्ध झाल्याने अंधत्वाला प्रतिबंध घालणे शक्य झाले आहे, असेही डॉ. मस्कटी म्हणाले.

एका बुबुळाचे दोघांमध्ये प्रत्यारोपण शक्यडॉ. मस्कटी म्हणाले, नेत्रदानातून मिळणाऱ्या एका बुबुळाचे प्रत्यारोपण एकाच रुग्णामध्ये होते. परंतु आता ज्या रुग्णांमध्ये बुबुळ प्रत्यारोपण करायचे असेल आणि त्या रुग्णाच्या बुबुळाच्या आतील भागात दुखापत झाली असेल तर तेवढाच भाग बदलविला जातो, किंवा ज्या रुग्णाचा बाहेरच्या भागात दुखापत झाली असेल तर तेवढाचा भाग बदलविण्यात येतो. यामुळे एका बुबुळाचा दोन रुग्णांमध्ये वापर होऊ शकतो. हे एक नवीन तंत्रज्ञान समोर आले आहे. याचा फायदा अंधत्व निवारण मोहिमेला होणार आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान