शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019; ‘इन्स्टाग्राम’वरही संघ राहणार सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 10:33 IST

विविध माध्यमातून ‘ऑनलाईन’ माध्यमावर सक्रिय राहणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आता ‘इन्स्टाग्राम’वरदेखील आगमन झाले आहे.

ठळक मुद्देप्रथमच उघडले ‘अकाऊंट’तरुणाईपर्यंत पोहोचणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बदलत्या काळासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचार-प्रसार धोरणातदेखील बदल होताना दिसून येत आहे. ‘ऑनलाईन’ माध्यमाचा संघाकडून मोठ्या प्रमाणात उपयोग सुरू असून ‘सोशल मीडिया’वरदेखील नियमितपणे ‘अपडेट्स’ येत असतात. विविध माध्यमातून ‘ऑनलाईन’ माध्यमावर सक्रिय राहणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आता ‘इन्स्टाग्राम’वरदेखील आगमन झाले आहे. अधिकृतपणे संघाचे खाते उघडण्यात आले असून येथे संघाशी निगडित विविध कार्यक्रमांची छायाचित्रे ‘शेअर’ करण्यात येणार आहेत.संघाच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून संघाशी जुळण्याचे माध्यम उपलब्ध करुन देण्यात आले आहे. संघाचे अधिकृत ‘टिष्ट्वटर हँडल’ आहे. याशिवाय ‘फेसबुक’वरदेखील संघाचे अधिकृत ‘पेज’ आहे. तरुणाईमध्ये ‘इन्स्टाग्राम’चा वापर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. जगासह तरुण पिढीपर्यंत संघाचे उपक्रम पोहोचण्यासाठी हे खाते उघडण्यात आले आहे.‘फेक अकाऊंट’ला बसणार आळासंघाच्या नावे काही स्वयंसेवकांनी ‘इन्स्टाग्राम’वर खाते उघडले होते. शिवाय काही अतिउत्साही लोकांनी तर ‘फेक अकाऊंट’देखील उघडले होते. यामुळे नेटिझन्ससह सामाजिक वर्तुळात संभ्रम निर्माण होत होता. त्यामुळेच ‘आर.एस.एस.ओआरजी_ऑफिशिअल’ या नावाने संघाचे अधिकृत ‘अकाऊंट’ सुरू करण्यात आले आहे. विजयादशमीच्या सोहळ्यादरम्यान या माध्यमातून सर्वात अगोदर छायाचित्र ‘शेअर’ करण्यात येणार आहेत.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ