शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचा उन्हाळा कुटुंब सर्वेक्षणात

By admin | Updated: April 28, 2017 03:02 IST

विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या कामातून शिक्षक अद्यापही निवांत झालेला नसताना, त्याच्यावर कुटुंब सर्वेक्षणाचे काम शिक्षण विभागाने सोपविले आहे.

आदेश धडकला, टेन्शन वाढले : संघटनांचा आक्रमक पवित्रा नागपूर : विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या कामातून शिक्षक अद्यापही निवांत झालेला नसताना, त्याच्यावर कुटुंब सर्वेक्षणाचे काम शिक्षण विभागाने सोपविले आहे. १९ एप्रिलला शिक्षण विभागाने आदेश काढून सर्व अनुदानित शाळा, जि.प.च्या शाळा व महापालिकेच्या शाळांच्या मुख्याध्यापकांना पाठविला आहे. हा आदेश धडकल्याने शिक्षकांचे टेन्शन वाढले आहे. अतिरिक्त ठरू नये म्हणून विद्यार्थी पटसंख्या वाढविण्याचे टेन्शन असताना, यात आता सर्वेक्षणाचे काम आल्याने शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिक्षण विभागाच्या या आदेशाविरोधात संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शासनाच्या कुठल्याही सार्वजनिक कामासाठी सर्वात पहिले टार्गेट म्हणजे शिक्षक. अशैक्षणिक कामातून मुक्तता करा, अशी कितीही ओरड केली तरी, शिक्षकांच्या मागची कामे थांबता थांबत नाही. नुकत्याच विद्यार्थ्यांच्या परीक्षा आटोपल्या आहेत. शिक्षक सध्या पेपर तपासणी, निकाल लावण्याच्या कामात व्यस्त आहेत. निकालानंतर या शिक्षकांना विद्यार्थ्यांना प्रवेशित करण्यासाठी घरोघरी फिरायचे आहे. कारण अपेक्षित पटसंख्या नसेल, तर शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची वेळ येते. या शैक्षणिक कामात व्यस्त असलेल्या शिक्षकांना शिक्षण विभागाने कुटुंब सर्वेक्षणाचे काम दिले आहे. २१ एप्रिल ते ८ मे दरम्यान शिक्षकांना हे काम करायचे असल्याचे आदेशात नमूद आहे. एप्रिल महिना संपत आला असताना शिक्षकांना नेमके सर्वेक्षण कसे करावे, याचे प्रशिक्षण दिलेले नाही. हा काळ शिक्षकांसाठी निकालाचा असल्यामुळे शिक्षक त्यात व्यस्त आहेत. अशात विद्यार्थ्यांचे हित बघावे की, विभागाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करावी, अशा पेचात शिक्षक सापडले आहेत.(प्रतिनिधी)