शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक दिन विशेष; त्यांच्या धडपडीमुळे विद्यार्थी गिरवितात अभ्यासाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 08:25 IST

आलागोंदी हे गाव आदिवासीबहुल आहे. बोटावर मोजण्याइतक्याच लोकांजवळ अँड्रॉइड मोबाईल आहे. या गावात राजेंद्र रामहरी टेकाडे हे आलागोंदी जि.प. प्राथमिक शाळेत एकल शिक्षक आहेत. त्यांच्या शाळेत केवळ १२ विद्यार्थी आहे. या विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू रहावे यासाठी टेकाडे सरांनी पुरेपूर प्रयत्न केले.

ठळक मुद्देकठीण काळातही बजावले शिक्षकाचे कर्तव्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा सर्वात मोठा फटका शिक्षण व्यवस्थेला बसला आहे. सरकारी विशेषत: ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षणाची प्रक्रियाच थांबली आहे. तर नामवंत खासगी शाळांमध्ये अजूनही शैक्षणिक शुल्काचा तिढा सुटलेला नाही. शासनानेही ऑनलाईन शिक्षण, दूरचित्रवाणीद्वारे शिक्षण, टिलिमिली, रेडिओसारख्या माध्यमातून शाळा बंद शिक्षण सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. पण शिक्षकच समोर नसल्यामुळे काहीअंशी हा प्रयत्नही असफल राहिला. शासनाच्या वारंवार निघणाऱ्या दिशानिर्देशामुळे काही शिक्षक शाळेत गेले, उपस्थिती नोंदविली आणि घरी परतले. पण काही धडपड्या शिक्षकांमुळे, त्यांच्यातील कल्पकतेमुळे त्यांच्या अध्यापनाचे कार्य शाळा बंद असले तरी थांबले नाही.- अभ्यासाला स्वाध्यायचा आधारकाटोल पं.स. अंतर्गत आलागोंदी प्राथमिक शाळेत वर्ग १ ते ५ पर्यंत शिक्षण मिळते. आलागोंदी हे गाव आदिवासीबहुल आहे. बोटावर मोजण्या इतक्याच लोकांजवळ अँड्रॉइड मोबाईल आहे. या गावात राजेंद्र रामहरी टेकाडे हे आलागोंदी जि.प. प्राथमिक शाळेत एकल शिक्षक आहेत. दुर्दैवाने त्यांच्या शाळेत केवळ १२ विद्यार्थी आहे. पण या बारा विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू रहावे यासाठी राजेंद्र टेकाडे सरांनी पुरेपूर प्रयत्न केले. अँड्रॉइड मोबाईल नसल्यामुळे ऑनलाईन शिक्षणाची संधीच नव्हती. त्यामुळे त्यांनी गावातील ३ शिक्षक मित्र तयार केले. त्यांनी स्वत: विषयाच्या स्वाध्याय पुस्तिका तयार केल्या. या स्वाध्याय पुस्तिका प्रत्येक विद्यार्थ्याला दिल्या. शिक्षक मित्रांना अध्यापनाची पद्धत शिकविली. एका शिक्षक मित्राकडे चार विद्यार्थी सोपविले. विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षक मित्राच्या सवडीनुसार दररोज दोन तास वर्ग सुरू झाले. २६ जूनपासून त्यांनी अशाप्रकारची शाळा सुरू केली. आजपर्यंत त्यांचा ३० टक्के अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. ते नियमित शिक्षक मित्रांच्या संपर्कात आहेत. विद्यार्थ्यांच्या स्वाध्याय पुस्तिका स्वत: तपासतात. विशेष म्हणजे या शिक्षकांनी आपली मुलीचा प्रवेशसुद्धा त्यांच्या शाळेत घेतला आहे. या उपक्रमामुळे २६ जूनपासून त्यांच्या शिक्षणात कधीही खंड पडला नाही.- टेक्नॉलॉजीचा केला वापरनागपूर महापालिकेच्या सुरेंद्रगड शाळेच्या विज्ञानाच्या शिक्षिका असलेल्या दीप्ती बिस्ट यांनीही शाळा बंद असली तरी अध्यापनाचे काम सातत्याने सुरू ठेवले.  मोबाईल असलेले आणि नसलेल्या विद्यार्थ्यांचा गट पाडला. मोबाईल असलेल्या विद्यार्थ्याला नसलेल्या विद्यार्थ्याची जबाबदारी दिली. बिस्ट यांनी टेक्नॉलॉजीचा वापर करून व्हॉट्सऑप, गुगल मीटद्वारे विद्यार्थ्यांना अभ्यासाशी जोडून ठेवले. स्वत:चे व्हिडिओ तयार करून यू-ट्यूबवर टाकले. फेसबुक पेज तयार करून अभ्यासाची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविली. विज्ञानाच्या प्रयोगाचे व्हिडिओ तयार करून विद्यार्थ्यांना त्याचे प्रात्याक्षिक करावयाला लावले. शिवाय दररोज संपर्क करून मुलांना होमवर्क देणे, प्रश्नोत्तर विचारणे दररोज सुरू ठेवले. विशेष म्हणजे त्यांनी कुणाच्याही आदेशाची वाट बघितली नाही. स्वत:च्या घरीच ऑनलाईन वर्ग सुरू केला. तो आजतागायत सुरू आहे.पालकांना समजाविले, माजी विद्यार्थ्यांची घेतली मदतजिल्हा उच्च प्राथमिक शाळा, रुयाड, ता. कुही येथील शिक्षिका सारिका रामदास उके या पाचव्या वर्गाला शिकवितात. कोरोनामुळे १६ मार्चपासून त्यांची शाळा बंद झाली. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या परीक्षादेखील होत्या. अशात विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे वर्ग घ्यायचे होते. शाळेत विद्यार्थ्यांना आणणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना ऑनलाईन अभ्यासाची माहिती दिली. काही माजी विद्यार्थी ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल होते, त्यांनाही विनंती केली आणि झुम अ­ॅपच्या माध्यमातून शिष्यवृत्तीचे वर्ग सुरू केले. पुढे २६ जूनपासून शाळेचे सत्रही त्यांनी याच पद्धतीने सुरू केले. एक वेळ निश्चित केली. त्यावेळी विद्यार्थ्यांना अध्यापन करू लागल्या. त्यांच्या वर्गात २५ विद्यार्थी आहेत. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन कळले नाही त्यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून त्यांचे समाधान करू लागल्या. त्यांच्या ऑनलाईन वर्गाला कोरोनाच्या काळात कधीही खंड पडला नाही. त्यांच्या या धडपडीमुळे ३० टक्के अभ्यासक्रम आतापर्यंत त्या पूर्ण करू शकल्या.

 

टॅग्स :Teachers Dayशिक्षक दिन