शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पदवीधर मतदारांच्या नोंदणीसाठी शिक्षक संघटना सरसावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 20:56 IST

शिक्षक संघटनांनी जास्तीत जास्त पदवीधर मतदार नोंदणी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. काही शिक्षक संघटना शिबिर लावून पदवीधरांची नोंदणी करवून घेत आहे.

ठळक मुद्देजास्तीत जास्त पदवीधरांची नोंद करण्यासाठी शिबिरांचे आयोजन : पदवीधरांची आणि प्रशासनाची झाली सोय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पदवीधर मतदार संघासाठी मतदार नोंदणीचे काम सुरू झाले आहे. यासाठी ६ नोव्हेंबरपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. मतदार नोंदणीसंदर्भात पदवीधरांपर्यंत माहिती पोहचविण्यात जिल्हा प्रशासनाकडे पूरक यंत्रणा नसल्याने नोंदणीसाठी इच्छुक पदवीधरांमध्ये गोंधळ उडाला आहे. त्यामुळे शिक्षक संघटनांनी जास्तीत जास्त पदवीधर मतदार नोंदणी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. काही शिक्षक संघटना शिबिर लावून पदवीधरांची नोंदणी करवून घेत आहे.भारतीय जनता पक्ष पूर्वीपासूनच पदवीधर मतदार संघाची निवडणूक लढवीत आला आहे. गंगाधरराव फडणवीस, नितीन गडकरी यांनी पक्षाच्या मार्गदर्शनात पदवीधर निवडणूक लढविली आहे. सध्या पदवीधर मतदार संघातून प्रा. अनिल सोले हे आमदार आहेत. त्यामुळे प्रशासनाबरोबर राजकीय पक्षांकडूनही पदवीधर मतदार नोंदणीसाठी अभियान राबविण्यात येते. मिळालेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पदवीधर मतदार संघासाठी यावर्षी नव्याने मतदार याद्या तयार करणे सुरू झाले आहे. राजकीय पक्ष यासाठी नेटाने भिडले आहे. त्याचबरोबर प्रशासनाच्या मदतीसाठी शिक्षक संघटनाही सरसावल्या आहेत. शिक्षकांच्या संघटनांनी शिबिराच्या माध्यमातून पदवीधर मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरू केली आहे.नागपूर पदवीधर मतदारसंघातील पदवीधरांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करायचा आहे. नाव नोंदणीसाठी अर्ज क्रमांक १८ भरून द्यायचा आहे. मात्र जुन्या मतदार याद्या रद्द झाल्याने, आता सर्वच पदवीधरांना नव्याने नोंदणी करावी लागणार आहे. परंतु यासंदर्भात आवश्यक माहिती जिल्हा प्रशासनाकडून पदवीधरांपर्यंत पोहचविण्यात अपयशी ठरल्याने मतदार नोंदणीसह इच्छुक पदवीधरांपुढे पेच निर्माण झाला आहे. अर्ज कुठून प्राप्त करायचा, भरलेला अर्ज कुठे जमा करायचा, कुठले प्रमाणपत्र द्यायचे असे अनेक प्रश्न पदवीधरांसमोर निर्माण झाले होते. हे प्रश्न शिक्षक संघटनांनी मोठ्या प्रमाणात सोडविले आहेत. विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ व संघर्ष वाहिनीने मतदार नोंदणीचा धडक कार्यक्रम राबविला आहे. दीनानाथ वाघमारे, मिलिंद वानखेडे, खिमेश बढिये, गणेश खोब्रागडे, रविकांत गेडाम, पुष्पा बढिये यांच्या माध्यमातून मतदारांची नोंदणी सुरू झाली आहे.तसेच फुले आंबेडकर टीचर्स असोसिएशननेसुद्धा पीडब्ल्यूएस कला वाणिज्य महाविद्यालय, टेका नाका, कामठी रोड येथे मतदान नोंदणीचे शिबिर सुरू केले आहे. संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत जांभुळकर, सत्यवान साखरे, प्रकाश भोयर, रत्नदीप गणवीर, श्रीकांत झाडगावकर यांच्या माध्यमातून मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे.शिक्षक हा सामान्य मतदार तर असतोच, पण तो पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातही मतदान करतो. मोठ्या प्रमाणात शिक्षक हा पदवीधर मतदार असतो. त्यामुळे शिक्षकांची नोंदणी हा मुख्य उद्देश आहेच, सोबतच शिक्षक ज्या महाविद्यालयामध्ये शिकवितो, तेथील पदवीधरांचीसुद्धा नोंद व्हावी, या भूमिकेतून मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले आहे. जास्तीत जास्त मतदारांची नोंद व्हावी, हा संघटनेचा उद्देश आहे.डॉ. जयंत जांभुळकर, अध्यक्ष, फुले आंबेडकर टीचर्स असो.

 

टॅग्स :Electionनिवडणूकnagpurनागपूर