शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांनीच लिहून दिली इंग्रजीची उत्तरपत्रिका; भंडारा जिल्ह्यातील वलनीतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 17:16 IST

शिक्षकांनीच अख्खी उत्तरपत्रिका सोडवून विद्यार्थ्यांच्या हाती दिल्याची खळबळजनक घटना भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातल्या एका विद्यालयात दहा दिवसांपूर्वी घडल्याचे उघड झाले आहे.

ठळक मुद्देसर्व शिक्षकांनी मिळून तयार केली उत्तरपत्रिकाअद्याप कुठेही लेखी तक्रार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: दहावीच्या परिक्षेत विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये यासाठी शिक्षण विभाग एकीकडे आटोकाट प्रयत्न करीत असताना दुसरीकडे शिक्षकांनीच अख्खी उत्तरपत्रिका सोडवून विद्यार्थ्यांच्या हाती दिल्याची खळबळजनक घटना भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातल्या एका विद्यालयात दहा दिवसांपूर्वी घडल्याचे उघड झाले आहे. याच विद्यालयातील एका धाडसी शिक्षकांनी हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये चित्रबद्ध केल्याने हे बिंग आता फुटले आहे.८ मार्च रोजी दहावीचा इंग्रजीचा पेपर होता. आपल्या संस्थेचा निकाल चांगला लागावा यासाठी एका विद्यालयातील मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी परिक्षा एक्सटर्नल कंडक्टरला हाताशी धरून हा प्रकार केल्याचे कळते. ही प्रश्नपत्रिका शाळेत पोहचताच परिक्षा सुरू होण्याच्या अर्धा तास आधी सर्व शिक्षकांनी मिळून त्याची आदर्श उत्तरपत्रिका तयार केली व ती विद्यार्थ्यांना सामुहिक कॉपी करण्यासाठी वाटली. हा सगळा प्रकार घडत असताना, तो न पटल्याने व त्याविरुद्ध त्यावेळी कुठलाच आवाज उठवणे शक्य नसल्याने एका शिक्षकाने तो प्रकार चित्रबद्ध केला. त्यांनी तात्काळ ती चित्रफीत शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडे दिली. मात्र त्याला दहा दिवस लोटूनही काहीच कारवाई न झाल्याने या कारवाईत शिक्षण विभागाचाच तर हात नाही ना अशी शक्यता वर्तविली जाऊ लागली होती.दरम्यान हा प्रकार प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या कानावर गेल्याने त्यांनी या प्रकरणाचा छडा लावण्याचे ठरविले आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटी घेणे सुरु केले. पवनीच्या गटशिक्षणाधिकारी स्वर्णलता घोडेस्वार यांची यासंदर्भात भेट घेतली असता त्यांनी, आतापर्यंत आपल्याकडे अशी लेखी तक्रार आली नसल्याचे स्पष्ट केले व फक्त तोंडीच तक्रार होत असल्याचे म्हटले. तथापि, या प्रकाराची माहिती वरिष्ठांना कळवून त्याची शहानिशा नक्कीच होईल असे आश्वासन घोडेस्वार यांनी दिले आहे.

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र