शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
3
"भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी’’, एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका   
4
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
5
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
6
हवेतच हेलकावे खाऊ लागले विमान, प्रवाशांचे प्राण संकटात, कर्मचाऱ्यांचा उडाला थरकाप, अखेर...
7
रतन टाटांच्या काळात जे घडलं नाही, ते आता घडणार; 'हा' मोठा ग्रुप टाटा सन्स सोडणार?
8
एक नंबर! गोड खाऊनही कमी करता येतं वजन; फक्त माहीत असायला हवी योग्य वेळ अन् पद्धत
9
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
10
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
11
Shravan Shukravar 2025: श्रावणातल्या कोणत्याही एका शुक्रवारी भरा देवीची ओटी आणि 'असा' मागा जोगवा!
12
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
13
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
14
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
15
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
16
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
17
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
18
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
19
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
20
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल

शिक्षणाधिकारी कार्यालयात शिक्षकांनी मांडले ठाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:17 IST

शालार्थ प्रणालीनुसार शिक्षकांची आॅनलाईन पगार बिलावरून जि.प. प्राथमिक शिक्षण विभाग व शिक्षक समन्वय कृती समितीमधील संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे.

ठळक मुद्देजि.प. प्रशासन व शिक्षक संघटनांमधील संघर्ष शिगेला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शालार्थ प्रणालीनुसार शिक्षकांची आॅनलाईन पगार बिलावरून जि.प. प्राथमिक शिक्षण विभाग व शिक्षक समन्वय कृती समितीमधील संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. शिक्षणाधिकाºयांनी पगार बिलाच्या संदर्भात निर्णय घ्यावा, या मागणीसाठी शिक्षकांनी शिक्षण विभागाच्या कार्यालयातच ठाण मांडले आहे.मागील काही दिवसापासून शिक्षकांनी सर्व प्रकारच्या आँनलाईन कामावर बहिष्कार घातला आहे. त्यामध्ये शालार्थ पगार बिलाचासुद्धा समावेश आहे. त्याबाबत शिक्षक समन्वय कृती समितीच्या वतीने ८ नोव्हेंबरपासून सुरू होणाºया संकलित मूल्यमापन चाचणीवर बहिष्कार घालण्यात येईल, अशी आंदोलनपूर्व सूचना ३० आॅक्टोबरलाच मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आली होती. परंतु त्याची दखल जि.प. प्रशासनाने घेतली नाही. त्यामुळे अजूनही हिंगणा, कामठी व उमरेड या तालुक्यांचे पगार बिल तयार करण्यात आले नाही. त्यामुळे सोमवारी या तीनही तालुक्यातील मुख्याध्यापकांनी शिक्षणाधिकारी(प्राथ.) यांच्या नावे लेखी निवेदन सादर करण्यासाठी आले होते; परंतु शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी कुणीही कार्यालयात उपस्थित नव्हते. त्यामुळे मुख्याध्यापकांनी शिक्षणाधिकारी यांच्या कक्षासमोरच ठाण मांडले. सायंकाळी ७ पर्यंत कुणीही अधिकारी आले नाही. त्यानंतर उपशिक्षणाधिकारी उपस्थित झाले. परंतु चर्चा न करताच निघून गेले. शेवटी या बाबीची माहिती शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे यांना दिली. त्यांनी शिक्षक समन्वय समितीच्या अध्यक्षाशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली, परंतु तोडगा निघाला नाही. दुसºयांदा शिक्षणाधिकाºयांनी संपर्क करून बाजू ऐकून घेतली व तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. परंतु लेखी आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली.शिक्षणाधिकाºयांच्या आदेशाकडे बीओंचे दुर्लक्षआज केंद्रप्रमुखाकडून अनेक मुख्याध्यापकांनी संकलित चाचणीचे पेपर स्वीकारले नाही. तर दुसरीकडे पेपरची उचल करण्याबाबत प्रशासनाकडून मुख्याध्यापकांवर दडपण आणल्या जात आहे. त्यामुळे ८ नोव्हेंबरपासून सुरू होणारी संकलित चाचणी होईल की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. कामठी, हिंगणा व उमरेड पं.स.च्या गटशिक्षणाधिकांºयाच्या आडमुठ्या धोरणामुळे हा वाद विकोपाला पोहोचला असून शिक्षणाधिकारी यांचे आदेश मागील काही दिवसापासून गटशिक्षणाधिकारी धुडकावून लावत आहे.तोडगा निघेपर्यंतबहिष्कार कायमजोपर्यंत पगारबीले पं.स.स्तरावरून काढण्याबाबत लेखी आदेश निघत नाही तोपर्यंत संकलित चाचणीवरचा बहिष्कार कायम राहील, असा इशारा जिल्हा शिक्षक समन्वय कृती समितीचे अध्यक्ष लीलाधर ठाकरे यांनी दिला आहे.