शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनीच्या आत्महत्येस शिक्षिका जबाबदार नाही

By admin | Updated: March 29, 2017 02:57 IST

विद्यार्थिनीच्या आत्महत्येस शिक्षिका जबाबदार नसल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.

हायकोर्टाचा निर्वाळा : एफआयआरमध्ये आवश्यक बाबींचा अभाव नागपूर : विद्यार्थिनीच्या आत्महत्येस शिक्षिका जबाबदार नसल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. जयश्री सुनील कोटगीरवार (५१) असे शिक्षिकेचे नाव असून, त्या वर्धा येथील केसरीमल कन्या शाळेत कार्यरत आहेत. मयत विद्यार्थिनीचे नाव निकिता अंड्रसकर होते. ती गजानननगर येथे राहत होती. तिचे वडील वाल्मिक व्यवसायाने सुतार असून आई वायगाव येथील कॉटन मिलमध्ये मजुरी करते. निकिता इयत्ता दहावीत शिकत होती. शाळेतील एका मुलाने निकितावर मोबाईल चोरीचा आरोप करून यासंदर्भात कोटगीरवार यांच्याकडे तक्रार दिली होती. कोटगीरवार यांनी निकिताच्या आईला याची माहिती दिली. परिणामी निकिताने २९ जानेवारी २०१६ रोजी गळफास लावून आत्महत्या केली. मोबाईल चोरीच्या आरोपामुळे आत्महत्या करीत असल्याचे तिने आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत लिहून ठेवले होते. परिणामी निकिताच्या वडिलांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून कोटगीरवार यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३०६(आत्महत्येस प्रवृत्त करणे)अंतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला. हा एफआयआर रद्द करण्यासाठी कोटगीरवार यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व इंदिरा जैन यांनी वरीलप्रमाणे निर्णय देऊन हा अर्ज मंजूर केला. कोटगीरवार यांच्यातर्फे अ‍ॅड. प्राजक्ता चौधरी यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी) म्हणून एफआयआर रद्द निकितावर शाळेतील विद्यार्थ्याने आरोप केला होता. कोटगीरवार यांनी स्वत: तिच्यावर संशय घेतला नव्हता. तसेच आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा सिद्ध होण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींचा एफआयआरमध्ये समावेश नाही. त्यामुळे कोटगीरवार यांच्याविरुद्ध खटला चालविणे निरर्थक ठरेल, असे न्यायालयाने निर्णयात स्पष्ट करून एफआयआर रद्द केला.