शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

झोनच्या बाहेर लोड करता येईल टीडीआर

By admin | Updated: June 10, 2015 03:04 IST

आरक्षित जमिनीवर ट्रान्सफर आॅफ डेव्हलपमेंट राईट (टीडीआर) देण्याची प्रथा आहे. यापूर्वी झोन आधारावरच टीडीआर लोड करता येत होता.

नागपूर : आरक्षित जमिनीवर ट्रान्सफर आॅफ डेव्हलपमेंट राईट (टीडीआर) देण्याची प्रथा आहे. यापूर्वी झोन आधारावरच टीडीआर लोड करता येत होता. मात्र, आता टीडीआर जमिनीच्या किमतीच्या(रेडीरेकनर) आधारावर निर्धारित केला जाण्याची शक्यता आहे. एखाद्या व्यक्तीला आपला टीडीआर झोनच्या बाहेरील व्यक्तीला विकायचा असेल तर नवा कायदा अस्तित्वात आल्यावर त्याला तो विकता येणार आहे.यापूर्वी टीडीआरसाठी शहराची चार झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यात ‘ए’ झोनला नॉन रिसिविंग झोनमध्ये ठेवण्यात आले. या झोनमध्ये इतवारी, महाल यासारख्या दाट वस्त्या येतात. येथे टीडीआर लोड करता येत नाही. ‘बी’ झोनमध्ये रामदासपेठ, बजाजनगर, शिवाजीनगर, लेंड्रापार्क, वाठोडा यासारखे रिंग रोडच्या आत असलेले भाग येतात. ‘सी’झोन अंतर्गत रिंग रोडच्या बाहेरील (मनपा सीमेच्या आतील) भाग येतो. सध्या ‘डी’ झोनचा काही उपयोग होताना दिसत नाही. सध्याच्या नियमानुसार ‘बी’झोनचा टीडीआर ‘बी’ मध्ये येणाऱ्या भागातच लोड केला जाऊ शकतो. यात टीडीआर लोड करणारी व्यक्ती त्याच्या जमिनीच्या किमतीपेक्षा अधिक किंमत घेत होती. मात्र, जेथे टीडीआर लोड होतो तेथे सुविधांची कमतरता आहे. रस्ते रुंद नाहीत. पार्किंगची जागा नाही. नव्या प्रस्तावित नियमानुसार जर वाठोडा येथील टीडीआर रामदासपेठमध्ये लोड करायचा असेल तर रामदासपेठेतील जमिनीच्या किमतीच्या बरोबरीत असलेला टीडीआर करावा लागेल. (प्रतिनिधी)प्रकरण १ : मौजा चिंचभुवन खसरा नंबर ३१०, ३१४, २७५ ही जमीन रस्त्याच्या डीपी रिझर्व्हेशनमध्ये नसतानाही टीडीआर जारी करण्यात आला. अर्ध्या रस्त्याला नासुप्रने गुंठेवारी अ‍ॅक्टअंतर्गत नियमित केले. उर्वरित अर्ध्या रस्त्याचा टीडीआर महापालिकेने एका बिल्डरला दिला. प्रकरण २ : स्मशान घाटासाठी मौजा हजारी पहाड येथील खसरा नंबर ९० वरील आराजी ४५२६ वर्ग मीटर आरक्षित जमिनीवर १.२५ एफएसआयच्या आधारावर ५६५८ वर्ग मीटर टीडीआर जारी करण्यात आला. जेव्हा की ज्या जागेचा टीडीआर स्मशान घाटाच्या नावार देण्यात आला तो ले-आऊटचा ओपन स्पेस आहे. प्रकरण ३: मौजा सीताबर्डी येथे रिझर्व्हेशन क्रमांक डब्ल्यू ५५ ही जमीन रस्ता रुंदीकरणात गेली. या जमिनीचा ५५३ वर्ग मीटरचा टीडीआर देण्यात आला. जेव्हा की रस्ता रुंदीकरणासाठी टीडीआर देता येत नाही. नियम तोडून टीडीआर देण्यात आला.