शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

टीसीच्या सतर्कतेमुळे पळून चाललेला अल्पवयीन मुलगा सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2023 20:25 IST

Nagpur News रागाच्या भरात घर सोडून पळून आलेला उत्तर प्रदेशातील एक अल्पवयीन मुलगा तिकीट तपासनीसांच्या सतर्कतेमुळे चाइल्ड लाइनच्या हाती लागला.

ठळक मुद्देउत्तर प्रदेशमधील मुलगा, रागाच्या भरात पळून आला भवितव्य अंधकारमय होण्यापासून बचावले

 

नागपूर : रागाच्या भरात घर सोडून पळून आलेला उत्तर प्रदेशातील एक अल्पवयीन मुलगा तिकीट तपासनीसांच्या सतर्कतेमुळे चाइल्ड लाइनच्या हाती लागला. त्याला सध्या येथील शासकीय बालगृहात ठेवण्यात आले असून, त्याचे पालक येथे आल्यानंतर त्याला त्यांच्या स्वाधीन केले जाणार आहे.

बिनू (वय १४, नाव काल्पनिक) हा मुरादाबाद (उत्तर प्रदेश) येथील रहिवासी होय. रागाच्या भरात तीन दिवसांपूर्वी त्याने घर सोडले. तो दिल्लीला आला आणि तेथील रेल्वे स्थानकावरून तो दिल्ली चेन्नई एक्स्प्रेसमध्ये बसला. जनरल डब्यात टीसी अमोल अन्विकर हे तिकीट तपासणी करत असताना, गुरुवारी सकाळी बिनू त्यांच्या नजरेस पडला. विनातिकीट असल्यामुळे तो घाबरला. आपल्याला आता टीसी पोलिसांच्या हवाली करतील, याची कल्पना आल्यामुळे तो अस्वस्थ झाला. त्याची ती अवस्था ध्यानात आल्याने टीसी अन्विकर यांनी त्याला विश्वासात घेतले. त्याला नागपूर रेल्वे स्थानकावर उतरवून घेतल्यानंतर त्याची आस्थेने विचारपूस केली. फलाट क्रमांक दोनवर त्याला खाऊपिऊ घातले. दरम्यान, चाइल्ड लाइनच्या सदस्यांच्या उपस्थितीत विचारपूस करण्यात आल्यानंतर बिनूने घरून पळून आल्याचे सांगितले. आपल्या पालकांचा पत्ता अन् संपर्क क्रमांकही सांगितला. त्यावरून चाइल्ड लाइनने रेल्वे पोलिसांच्या माध्यमातून बिनूच्या पालकांशी संपर्क साधला.

परिस्थितीमुळे त्यांना येण्यास दोन ते तीन दिवस विलंब होणार असल्याचे लक्षात आल्यामुळे बिनूला शासकीय बालगृहात ठेवण्यात आले. त्याचे पालक नागपुरात आल्यानंतर बिनूला त्यांच्या हवाली केले जाणार आहे. तिकीट तपासणीस अन्विकर यांच्या सतर्कतेमुळे बिनू पालकांपासून दूर जाण्यापासून बचावला. त्याचे भवितव्य अंधकारमय होण्यापासूनही बचावले.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे